Wednesday, March 29, 2023

राज्य सरकारने तात्काळ शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करावा; सभागृहात अजित पवारांनी केली मागणी

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून पायऱ्यांवर उतरत जोरदार आंदोलन केले. सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात होताच विरोधी पक्षनेते अजित पवारांनी आक्रमक पावित्रा घेतला. “शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारने आज चर्चा घ्यावी. राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सरकारने तात्काळ सोडवावे. सरकारने शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करावा,” अशी मागणी अजित पवार यांनी सभागृहात केली.

कांदा आणि कापसाच्या दराचा प्रश्न आज सभागृहात विरोधकांनी उचलून धरला आहे. अजित पवारांनी राज्य सरकारकडे कांदा खरेदी करण्याचाही मागणी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी कांद्याच्या प्रश्न उपस्थित केला. कांद्याच्या निर्णयाला परवानगी द्यावी. केंद्र सरकारसोबत बोलून कांद्याच्या प्रश्नावर तोडगा काढावा. कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत. नाफेडनं कांदा खरेदीला सुरुवात केली तर दर स्थिर राहिलं, असे भुजबळ यांनी म्हंटले.

- Advertisement -

शेतकरी मित्रांनो आपण आपल्या शेतात घेत असलेल्या शेतमालास योग्य बाजारभाव मिळतोय का? आज कोणत्या मालाचा काय भाव आहे? हे रोजचे बाजारभाव चेक करणे खूप गरजेचे आहे. गुगल प्ले स्टोअरवरील Hello Krushi या मोबाईल अँपच्या मदतीने आता शेतकरी स्वतः आपल्याला हव्या त्या शेतमालाचा महाराष्ट्रातील कोणत्याही बाजारसमितीमधील ताजा बाजारभाव चेक करू शकतो. तुम्हीही या अतिशय महत्वाच्या सेवेचा मोफत लाभ घेण्यासाठी आजच तुमच्या मोबाईलवर Hello Krushi अँप डाउनलोड करून घ्या.

Hello Krushi हे अँप Download करण्यासाठी Click Here

विरोधकांनी मागणी केल्यानांतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भूमिका मांडली. ते म्हणाले की, राज्यातील सरकारं हे शेतकऱ्यांचे सरकार आहे. शेतकऱ्याला जी मदत लागेल ती मदत सरकार करेल. कांद्याची खरेदी नाफेडने सुरु केली. कांदा निर्यातीवर कोणतीही बंदी नसून सरकार कांदा आणि कापूस उत्पादकांच्या पाठिशी ठाम आहे. सरकार कांदा उत्पादकांना आवश्यक ती मदत करेल, असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सभागृहात विरोधकांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले. आपल्याला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मार्ग काढायचा आहे की राजकारण करायचं आहे? असा सवाल फडणवीसांनी विरोधकांना विचारला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे कांद्याची खरेदी नाफेडने सुरू केली आहे. विरोधकांकडे जर वेगळी माहिती असेल, तर त्यांनी हक्कभंग आणावा, असे आव्हान देखील फडणवीसांनी विरोधकांना दिले.