सभागृहात काका- पुतण्यात कलह!! रोहित पवारांच्या ‘त्या’ भूमिकेवर अजितदादांची नाराजी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार कर्जत – जामखेड येथील एमआयडीसीला मंजुरी मिळावी यासाठी एकटेच आंदोलन करताना दिसले. यानंतर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी त्यांची समजत काढून आश्वासन दिल्यानंतर रोहित पवारांनी हे आंदोलन मागे घेतले. मात्र आंदोलनामुळे काका अजित पवार पुतण्यावर नाराज झाल्याचे पाहिला मिळाले.

रोहित पवारांनी केलेल्या आंदोलनाची नाराजी अधिवेशनात अजित पवार यांनी बोलून दाखवली. राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख रोहित पवारांची बाजू विधानसभेत मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र यावर आपले मत व्यक्त करताना, “लोकप्रतिनिधींनी ( रोहित पवार) उद्योगपतींनी दिलेल्या पत्रांची दखल घेतली पाहिजे. अशा पद्धतीने आंदोलनाला बसणं हे उचित नाही” असे अजित पवार यांनी अधिवेशनात म्हणले.

यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांना प्रत्युत्तर देताना अजित पवार म्हणाले, “देशमुखांनी विधिमंडळ सदस्यांबाबत एक मुद्दा उपस्थित केला आहे. त्यासंदर्भातल्या एका पत्राची कॉपी माझ्याकडे आहे. उदय सामंत यांनी १ जुलै २०२३ ला रोहित पवारांना पत्र दिलं आहे. या पत्रात “अधिवेशनात संबंधितांसमवेत बैठक आयोजित करून योग्य निर्णय घेतला जाईल. त्यामुळे उपोषणाचा निर्णय मागे घ्यावा ” असे म्हणले आहे.मात्र अजून ही अधिवेशन संपलेले नाही. आत्ता फक्त अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी उद्योगमंत्र्यांनी दिलेल्या पत्राची दखल घेतली पाहिजे. अशा पद्धतीने आंदोलनाला बसणं उचित नाही” असे अजित पवार यांनी म्हणले आहे. त्यांच्या या बोलण्यातून अजित पवारांना रोहित पवारांनी केलेले आंदोलन पटले नसल्याचे साफ दिसत आहे.

दरम्यान अधिवेशनात अनिल देशमुख यांनी रोहित पवारांची बाजू मांडली.  रोहित पवारांनी एमआयडीसीच्या स्थापनेची मागणी गेल्या अधिवेशनात केली होती. तेव्हा उदय सामंतांनी अधिवेशन संपण्याआधी अध्यादेश काढण्याचे आश्वासन दिले होते. पण आता दुसरं अधिवेशन सुरु झालं. तरी अजूनही तो आदेश निघालेला नाही. त्या मागणीसाठी रोहित पवार उपोषणाला बसले असून त्याची शासनाने दखल घ्यावी” असे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हणले होते.