अजित पवारांना डेंग्यूची लागण; प्रफुल्ल पटेल यांनी ट्विट करत दिली माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) याना डेंग्यूची लागण झाली आहे. राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. अजित पवार मागील काही दिवसांपासून सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही दिसत नव्हते. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं होतं. आज अखेर त्यांना डेंग्यूची (Dengue) लागण झाल्याचे समोर आलं आहे.

प्रफुल्ल पटेल यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हंटल कि, श्री अजित पवार सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित नसल्याच्या प्रसा प्रसारमाध्यमांच्या बातम्यांच्या विरोधात, मी हे स्पष्ट करू इच्छितो की, अजित पवार याना शनिवारी डेंग्यूचे निदान झाले आहे. डेंग्यूची लागण झाल्याने त्यांना पुढील काही दिवस विश्रांतीचा सल्ला दिला आहे. अजित पवार नागरिकांच्या सेवेसाठी कटिबद्ध आहेत. अजित पवार पूर्ण बरे झाले की ते पुन्हा जनतेच्या सेवेसाठी पूर्ण शक्तीने परततील.

राज्यात अजित पवार यांच्या नाराजीच्या बातम्या सुरु झाल्या होत्या, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेल्यानंतर अजित पवार नाराज असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये रंगत होत्या. तसेच मराठा समाज सुद्धा अजित पवारांविरोधात आक्रमक झाला असून काल त्यांचा बारामतीचा दौरा रद्द झाला होता. पण आता त्यांना डेंग्यूची लागण झाल्याचे समोर आलं आहे.