अपमान होण्यापेक्षा राजकारणातून संन्यास घेतलेला बरा; अजितदादा असं का म्हणाले?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2024 ला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा करेक्ट कार्यक्रम करणार असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला होता. त्याबाबत खुद्द अजितदादांना विचारलं असता, बावनकुळे बोलल्यापासून मला झोपच येईना. त्यामुळे मी विचार करतोय राजकारणच सोडावं असं म्हणत खिल्ली उडवली आहे. महाराष्ट्र राज्य विधिमंडळ अधिवेशन सध्या सुरु आहे यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवारांनी उपहासात्मक टीका केली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे बोलल्यापासून मला झोपच येईना. हे ऐकल्यापासून आमच्या सर्वांची झोप हरपली आहे. बावनकुळेंसारखा एवढा मोठा ताकदीचा नेता अशा पद्धतीने आव्हान देतोय, त्यामुळे मी विचार करतोय राजकारणच सोडावं. राजकारणातून संन्यास घ्यावा. 2024ला असा अपमान होण्यापेक्षा राजकारणातून संन्यास घेतलेला बरा, अशी खिल्ली अजित पवारांनी उडवली.

बावनकुळे नेमकं काय म्हणाले होते?

येत्या 2024 निवडणुकीत अजित पवारांचा करेक्ट कार्यक्रम होईल. बारामती शहर सोडून संपूर्ण लोकसभेत अजितदादांच्या वागण्याबाबत लोकांच्यात नाराजी आहे. हुकूमशाही सारखं राजकारण चालू आहे. त्यामुळे जशी माझी एंट्री झाली तसे ते घाबरले आहेत . सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता असं आयुष्य अजित पवारांनी उपभोगलं आहे. अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली होती.