अजित पवारांमुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर उद्रेक होईल : आ. शंभूराज देसाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
अजित दादांनी छ. संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणू नका, बोलणं हे निषेधार्य आहे. या वक्तव्याचा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर उद्रेक होईल, हे त्यांच्या लक्षात येईल. संभाजी महाराज हे काल ही धर्मवीर होते. आज पण धर्मवीर आहेत. मानव जोपर्यंत पृथ्वीतलावर आहे. तोपर्यंत छत्रपती संभाजी महाराज धर्मवीरच राहतील, असे विधान उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे.

सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. हिवाळी अधिवेशनात शेवटच्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छ. संभाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा आ. देसाई यांनी समाचार घेतला. ते पुढे म्हणाले, छ. संभाजी महाराजांना धर्मपरिवर्तन करा, मुस्लिम धर्म स्विकारावा. आम्ही तुम्हांला सोडतो असे सांगितले होते. त्यांचे 40 दिवस हाल करण्यात आले. परंतु धर्मरक्षणासाठी महाराजांनी बलिदान दिलं, परंतु धर्म सोडला नाही. मग छ. संभाजी महाराजांना धर्मवीर, धर्मरक्षक म्हणायचं नाही का? दादांना हे मान्य नाही का? दादांना असं वाटत होतं का, धर्मासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी केलेलं बलिदान योग्य नाही का? धर्मरक्षणासाठी महाराजांनी बलिदान दिलं, परंतु धर्म सोडला नाही. मग छ. संभाजी महाराजांना धर्मवीर, धर्मरक्षक का म्हणायचे नाही, असा सवाल उपस्थित केला आहे.

अजित दादाचं वक्तव्य “लोका सांगे ब्रम्हज्ञान स्वतः कोरडे पाषाण”
विधानसभवनात अजित पवार यांनी दुसऱ्या दिवशी विधानसभेमध्ये महापुरुषांबद्दल राष्ट्रपुरुषांबद्दल भाजप- सेना सरकार मधले मंत्री आणि बाहेर पदाधिकारी काय बोलतात अगदी द्वेषाने भाषण करत होते. सुरुवातीचे ते भाषण आणि शेवटी सभागृह संपतानाचे भाषण पहा. छ. संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणू नका याचा अर्थ “लोका सांगे ब्रम्हज्ञान स्वतः कोरडे पाषाण” अस अजिदादांच वक्तव्य आहे. याची निंदा करावी एवढी कमी आहे, असे शंभूराज देसाई म्हणाले.