Akshay Shinde Encounter : गोळ्या घालण्यापेक्षा तुडवून मारले पाहिजे; उदयनराजेंची बेधडक प्रतिक्रिया

Akshay Shinde Encounter udayanraje
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बदलापूर प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या अक्षय शिंदेंचा पोलिसांच्या चकमकीत मृत्यू झाल्याचे घटनेनं खळबळ उडाली आहे. आरोपीला ट्रान्सिट रिमांडसाठी नेत असताना पोलिसांनी स्वः संरक्षणासाठी त्याच्यावर गोळ्या झाडल्या (Akshay Shinde Encounter) असं सांगण्यात येत आहे.एकीकडे या संपूर्ण प्रकरणावरून विरोधकांनी सरकारविरोधात रान उठवलं असताना भाजप खासदार उदयनराजे (Udayanraje Bhosle) यांनी बेधडक प्रतिक्रिया देत अशा गुन्हेगारांना गोळ्या घालण्यापेक्षा लोकांच्यात सोडून तुडवून मारले पाहिजे असं म्हंटल आहे.

लोकांनी कोणाकडे न्याय मागायचा? Akshay Shinde Encounter

प्रसारमाध्यमांशी बोलताना उदयनराजे म्हणाले, मला आश्चर्य वाटतं कि लोकांना समजत कस नाही, हीच घटना जर आपल्या कुटुंबातील कोणासोबत घडलं असत तर तुमची रिअक्शन काय असती? तरीही अशा लोकांचे वकीलपत्र स्वीकारलं जाते आणि त्यांना निर्दोष करण्याचे सिद्ध केलं जाते. जर न्याय मिळत नसेल तर लोक तरी काय करणार? लोकांनी कोणाकडे न्याय मागायचा? आता गुन्हेगारांना धाक राहिलेला नाही. त्यामुळे छत्रपती शिवरायांच्या काळातील न्यायव्यवस्था झाली पाहिजे. त्यासाठी कायद्यात बदल करा. कोणी बलात्कारासारखे गुन्हे केले तर त्यांना फाशी देऊन टाका, किंवा लोकांच्या ताब्यात द्या. अत्याचार झालेल्या मुलीच्या कुटुंबाला ज्या परिस्थितीला सामोरे जावे लागते, त्या कुटुंबाच्या जागेवर मी स्वत:ला ठेवून मी बोलत असतो. गोळ्या घालून मारणे हे अतिशय सहज झाले. अशा लोकांना जनतेत सोडले पाहिजे. जनतेने त्यांना तुडवून मारले पाहिजे असं म्हणत उदयनराजे यांनी संताप व्यक्त केला.

दरम्यान, काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मात्र अक्षय शिंदेच्या एंकॉउंटर वरून (Akshay Shinde Encounter) सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. गृहमंत्र्यांनी कोणत्या संस्थाचालकाला वाचवण्यासाठी, इतर कोणत्या आरोपींना वाचवण्यासाठी त्याचा आवाज बंद केला का? असा थेट सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. बदलापूर प्रकरणी राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. अशा परिस्थितीमध्ये या घटनेची सखोल चौकशी करण्याऐवजी आरोपीला मारून टाकले जाते असं म्हणत अक्षय शिंदे यांचा एन्काऊंटर झाल्यानंतर या प्रकरणात कोण संस्थाचालक आणि आरोपी होते हे कधीही बाहेर येणार नाही असं मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं.

दुसरीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही सरकारला ३ सवाल केले आहेत. बदलापूर अत्याचार प्रकरणातील शाळेच्या विश्वस्तांना अद्याप अटक झालेली नाही, ते फरार आहेत त्यांना अद्याप अटक का होऊ शकत नाही? फरार आरोपींना वाचवण्यासाठी या प्रकरणातील मुख्य आरोपीचे एन्काऊंटर करून प्रकरण संपवण्याचा प्रयत्न आहे का? हे संपूर्ण प्रकरण दाबण्याचा वरिष्ठ पातळीवरच्या प्रयत्नांचा भाग म्हणून पोलिसांमार्फत आरोपीचे एन्काऊंटर केले आहे का? असा सवाल करत या प्रकरणाचे सत्य समोर येण्यासाठी उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तींमार्फत चौकशी करावी अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.