Monday, January 30, 2023

अयोध्येतील राम मंदिर उडवून देण्याची धमकी

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेश राज्यातील अयोध्या येथील प्रभू श्रीरामांचे राम मंदिर उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. अल कायदा या दहशतवादी संघटनेने धमकी असल्याचे सांगितले जात आहे.

अयोध्या येथील राम मंदिराचे उभारणीचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरु आहे. राम मंदिर उघडणार याची तारीख काल गृहमंत्री अमित शाह यांनी घोषित केली. त्यानंतर आज आंतरराष्ट्रीय जिहादी संघटनेने गझवा-ए-हिंद या त्यांच्या नियतकालिकात मंदिर उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. या नियतकालिकाच्या ताज्या अंकात अल कायदा ही संघटना अयोध्येतील राम मंदिर तोडून त्या ठिकाणी मस्जिद बांधणार असल्याचेही म्हटलं आहे.

- Advertisement -

धमकी देण्यात आलेले नियतकालिक हे 110 पानांचे आहे. नियतकालिकेच्या संपादकीयात म्हटलं आहे की, ज्या प्रकारे बाबरी मशिदीच्या ढाच्यावर राम मंदिर बांधण्यात येतंय, ते पाडले जाईल. मूर्तींच्या जागी अल्लाहच्या नावाने बाबरी मशिद बांधली जाईल. या सगळ्यासाठी बलिदान हवे असल्याचे नियतकालिकेत म्हंटले आहे.