आळंदी- पंढरपूर मार्गावर न्यायालयाचा आदेश डावलून सहापदरीकरणाचे काम सुरू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

आळंदी- पंढरपूर राष्ट्रीय मार्गाचे भुसंपादनाचे व सहापदरीकरणाचे काम सुरू असून तरडगाव हद्दीमध्ये नँशनल हायवे आँथोरिटी आँफ इंडिया (NHAI) यांच्या मार्फत आर. के. कंन्ट्रक्शंन काम करत आहे. त्यातील फलटण ते लोणंद हद्दीत यापूर्वी बारामती – फलटण- लोणंद शिरवळ या चौपदरीकरण मार्गासाठी 2012 ते 2015 मध्ये खाजगी वाटाघाटीतून, तसेच जुन्या भुसंपादन कायद्याप्रमाणे संपादन करण्यात आले होते. परंतु चौपदरीकरणासाठी दिलेला दर कमी असल्याने, या विरोधात मा. उच्च न्यायालयात याचिका दाखल करून दाद मागण्यात आली होती. त्यावेळी नवीन कायद्याने शेतकऱ्यांना मोबदला मिळावा असे मा. उच्च न्यायालयाने सांगितले होते. परंतु यावर PWD, पुणे व पुढे NHAI यांनी कुठलाही वाढीव मोबदला दिला नाही.

तरडगाव हद्दीचा विचार करता जवळपास 45 शेतकऱ्यांच्या कडून खाजगी वाटाघाटीने फसवणूक करून व भुसंपादन कायद्याचे उल्लंघन करून भूसंपादन करण्यात आले होते. नंतर 2018 साली आळंदी पंढरपूर मार्गाचे भुसंपादन सुरू झाले. परंतू पुर्वी चौपदरीकरणामध्ये फसवून आणि चुकीच्या पद्धतीने खाजगी वाटाघाटीने घेतलेल्या शेतकऱ्यांच्यावर अन्याय झाला होता. म्हणून तरडगाव येथील सर्व शेतकऱ्यांनी डाॅ. ज्योती काकडे, डॉ. मिलिंद काकडे, सुभाष गायकवाड, बाळासाहेब मोहिते यांच्या नेतृत्वाखाली NHAI, PWD पुणे, तत्कालीन चौपदरीकरण भूसंपादन अधिकारी – फलटण प्रांत, जिल्हाधिकारी, सातारा यांच्या विरोधात सन्मानिय उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सदर याचिका मा. उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली त्याच्या दोन तारीखा झाल्या असून दि. 2/8/22 रोजी NHAI च्या वकीलांनी आपले म्हणणे मांडण्यासाठी 15 दिवसाचा कालावधी मागून घेतल्यामुळे पुढील सुनावणी 30/8/22 ला ठेवण्यात आली आहे.

दरम्यान काळात दिनांक 8/8/22 रोजी डॉ. काकडे यांच्या हाँस्पिटलची संरक्षण भिंत पाडण्यासाठी NHAI चे श्री. साळुंखे (जे रिटायर्ड आहेत व त्यांना या पदावर काम करण्याचा अधिकार आहे की नाही हे माहिती नाही), श्री. पाटील तसेच आर. के. कंन्ट्रक्शंनचे श्री. गोडसे, श्री रेड्डी यांनी जबरदस्तीने, आणि आरेरावीची भाषा बोलत, चांदोबाचा लिंब तरडगाव येथे आयुर्वेदिक हाँस्पिटलची भिंत पाडण्याचा व गेली 15 वर्षे लावलेल्या, आवळा, आंबा, चिंच इ. हाँस्पिटल समोरील झाडांची कत्तल करण्याचा पर्यंत केला. यावेळी डॉ. ज्योती व डॉ. मिलिंद काकडे यांनी हे प्रकरण सन्मानीय उच्च न्यायालयात असल्याचे सांगितले. परंतु कुठल्याही विनंतीस भीक न घालता आयुर्वेद सिटी हाँस्पिटलची संरक्षण भिंत पाडण्याचा प्रयत्न सुरू ठेवला.

सगळा प्रकार लोकशाहीची पायमल्ली करणारा :- उच्च न्यायालयाचा पुढील आदेश येईपर्यंत तरडगाव हद्दीत कुठलेही जबरदस्तीने भूसंपादन किंवा जमीनीचा ताबा घेवू नये व असे केल्यास या हुकूमशाही प्रवृत्तीच्या विरोधात येत्या 15 आँगस्टला चांदोबाचा लिंब, तरडगाव येथे आत्मदहनाचा इशारा डॉ. मिलिंद काकडे व डॉ. ज्योती काकडे यांनी दिला आहे.