Alert: मुंबईत नवा इशारा; पुढील काही तास जोरदार वाऱ्यासह अतिमुसळधार पाऊस पडणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन: एकीकडे संपूर्ण राज्यामध्ये कोरोनाची परिस्थिती भयावह असताना दुसरीकडे राज्यात तौक्ते चक्रीवादळाने धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. रायगड मध्ये अनेक झाड कोसळली, घर पडली आहेत. त्यानंतर आता मुंबईवर देखील या वादळाचा परिणाम जाणवू लागलाय. मुंबई आणि उपनगरांमध्ये दुपारनंतर जास्त परिणाम जाणवू लागला आहे. किनाऱ्याजवळ तर तुफानी वारे वाहत आहे. पूर्व आणि पश्चिम उपनगरात सकाळी अकरा वाजल्यापासून तुफान पावसालाही सुरुवात झाली आहे. त्यामुळे हवामान विभागाने नवा आदेश जारी केला आहे. मुंबई अति मुसळधार पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून(आय.एम.डी) व्यक्त करण्यात आला आहे.

हे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकत असले तरी मुंबई, ठाणे, रायगड, मधील भागांना मोठा फटका देत हे वादळ पुढे सरकत आहे. पुढच्या काही तासात मुंबईत जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडेल असे आय.एम.डीने सांगितले आहे. वाऱ्याचा वेग काही ठिकाणी कमाल ताशी 120 किलोमीटर पर्यंत पोहोचण्याचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकर, ठाणेकरांनी सावध रहावं गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नये आणि सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबईमध्ये अलर्ट जारी

दरम्यान मुंबईमध्ये अलर्ट जारी करण्यात आलेला आहे मुंबईच्या परळ भागात पाणी साठायला सुरुवात झाली आहे. तसाच अंधेरी सबवे सुद्धा पाण्याखाली गेल्याने तिथे वाहतूक बंद करण्यात आली आहे. ठाण्यात दुपारपासून वाऱ्याचा आणि पावसाचा जोर वाढला महापालिकेच्या हद्दीत तेरा मोठी झाड पडली असून अनेक गाड्यांचे नुकसान झाले आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात वेगवान वारे वाहत असून पाऊस देखील सुरू आहे. सोसाट्याचा वारा मुसळधार पाऊस मोठ्या लाटा यामुळेच ट्रॉम्बे जेट्टीत नांगरलेल्या बोटीचा मोठं नुकसान झालंय. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अपडेट नुसार चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने आगेकूच करत आहे. त्याचं रूपांतर अत्यंत तीव्र चक्रीवादळात झाले असून रात्री आठ नंतर ते गुजरात किनारपट्टीच्या जवळ पोहोचले रात्री अकराच्या सुमारास किनारपट्टीला धडकण्याची चा अंदाज वर्तवण्यात आला आहे

Leave a Comment