हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपली पृथ्वी त्याचप्रमाणे अंतराळाबाबत देखील अनेक लोकांनी विविध दावे केलेले आहेत. यासोबतच एलियन बाबत देखील अनेक दावे करण्यात आलेले आहे. अशातच आता एक नवा दावा अमेरिकेचे UFO प्रचारक स्टीव्ह बॅसेट यांनी केलेला आहे. त्यांच्यामध्ये कॅथलिक चर्च यांना गेल्या अनेक वर्षापासून UFO बद्दल संपूर्ण माहिती आहे. परंतु त्यांनी ती माहिती लपवून ठेवलेली आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे जर त्यांचा तपास केला तर त्यांच्याकडे दोषी असल्याचे कागदपत्र सापडतील.
माध्यमांना दिलेल्या एका मुलाखतीत स्टीव्ह यांनी सांगितले आहे की, चर्चमधील धार्मिक चित्रे ही एलियन्सचे अस्तित्व दाखवतात. कॅथलिक चर्चला देखील या सगळ्याबद्दलची माहिती गेल्या शेकडो वर्षापासून होती. त्याचप्रमाणे त्यांनी केलेल्या दाव्यानुसार 1933 मध्ये पृथ्वीवर जे यान कोसळले त्यातून किमान दहा एलियन्स हे पृथ्वीवर आढळलेले आहे. आणि 11933 मध्येच UFO चा शोध लागलेला आहे.
अमेरिकन सरकारकडेही माहिती होती
अमेरिकेचे माजी हवाई दल अधिकारी डेव्हिड ग्रुश यांनी गेल्या वर्षी दावा केला होता की, अमेरिकेकडे UFO चे तुकडे आहेत. बॅसेट म्हणाले की आतापर्यंतचे पुरावे माफक आहेत. ग्रुशच्या दाव्यांची चौकशी करणे आवश्यक आहे. तपास केला तर हे उघड होईल की अमेरिकन सरकारला एलियन्सचे अस्तित्व 1947 च्या रोझवेल घटनेच्या खूप आधीपासून माहीत होते.
स्टीव्ह बॅसेटच्या दाव्यानंतर, तज्ञ व्हॅटिकनच्या अभिलेखागारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांना हजारो वर्षांच्या रेकॉर्डमध्ये प्रवेश करण्यासाठी होली सी या चर्चच्या सर्वोच्च प्रशासकीय मंडळाकडून परवानगी घ्यावी लागेल. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष एलियन्सच्या अस्तित्वाचा औपचारिक खुलासा करेपर्यंत चर्च संशोधकांना आत जाऊ देणार नाही, असे सांगितले आहे.