हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Aliens म्हणजे परग्रहवासी बद्दल आपल्या मनात नेहमीच कुतूहल असत.. खरंच या ब्रह्माण्डात Aliens असतील का? जर असतील तर मनुष्य आणि Aliens कधी आमनेसामने येऊ शकतात का? याबाबत तुमच्या मनात नक्कीच कधी ना कधी विचार आला असेल. त्यातच आता बुल्गेरियाचे प्रसिद्ध भविष्यकार बाबा वांगा (Baba Vanga) यांची एलिअन्स बाबत चक्रावून टाकणारी भविष्यवाणी समोर आली आहे. बाबा वांगा यांच्या भविष्यवाणी नुसार, २१२५ मध्ये एलियन्स पृथ्वीवर येऊ शकतात. ते युरोप खंडातील हंगेरी या देशाला पहिला संदेश देतील.
बाबा वांगा यांनी भविष्यातील अनेक घटनांचे भाकीत केले आहे, त्यापैकी एक म्हणजे हंगेरीला मिळालेले हे अंतराळ संकेत. बाबा वांगाच्या भाकितानुसार, हंगेरी हे पहिले ठिकाण असेल जिथे परग्रही त्यांचे सुरुवातीचे संकेत पाठवतील आणि तिथून त्यांचा पृथ्वीशी पहिला थेट संपर्क सुरू होईल. बाबा वांगा यांनी दावा केला की २१२५ मध्ये परग्रही लोक पृथ्वीवर येण्याचा प्रयत्न करतील आणि हंगेरी त्यांच्या संदेशांचे स्वागत करेल. बाबा वांगा म्हणाले की, हा संपर्क अवकाशातून येणाऱ्या सिग्नलद्वारे होईल, जो हंगेरीपर्यंत पोहोचेल. खरं तर बाबा वांगाची भाकिते अनेकदा संशयाच्या नजरेने पाहिली जातात कारण त्यांना वैज्ञानिक पुरावे मिळत नाहीत. बरेच जण या गोष्टीबाबत शक्यता वर्तवत नाहीत. परंतु आजपर्यंत त्यांनी केलेल्या बहुतांश भविष्यवाण्या खऱ्या ठरलेल्या आहेत.
बाबा वांगा यांनी २०२५ साठीही अनेक भविष्यवाण्या सांगितल्या आहेत. बाबा वांगाच्या भाकितानुसार, २०२५ मध्ये सीरियाचे पतन झाल्यास जागतिक संघर्ष निर्माण होईल. सीरियाच्या पतनानंतर, पूर्व आणि पश्चिम देशांमध्ये एक जागतिक युद्ध सुरू होईल, जे तिसरे महायुद्ध म्हणून ओळखले जाईल. याशिवाय, बाबा वांगा यांनी २०२५ सालासाठी भाकीत केले आहे की मानव पृथ्वीबाहेर संवाद स्थापित करण्यात यशस्वी होऊ शकेल.तसेच की २०२५ मध्ये अशा मोठ्या आपत्ती येतील ज्यामुळे पृथ्वीच्या विनाशाची सुरुवात होईल.
बाबा वेंगा कोण होते?
बाबा वांगा यांना बल्गेरियन पैगंबर म्हणूनही ओळखले जाते आणि त्यांचा जन्म १९११ मध्ये रशियाच्या ऑट्टोमन साम्राज्यात झाला. वयाच्या १२ व्या वर्षी वादळामुळे त्यांची दृष्टी गेली, ज्यामुळे त्यांना संपूर्ण आयुष्य अंधत्वाने जगावे लागले. ती एक तेजस्वी संदेष्टी होती ज्यांनी ५०७९ पर्यंत भविष्यवाणी केली होती. त्यांचे निधन १९९६ मध्ये ८५ व्या वर्षी झाले.