गोवा विसराल असं सौंदर्य, तेही अर्ध्या खर्चात ; उन्हाळ्यात भेट द्या महाराष्ट्रातील ‘या’ ठिकाणाला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

उन्हाळा आला की सुट्टी, समुद्रकिनारा, थंडगार वारा आणि चविष्ट सी फूड यांचीच आठवण होते. पण गोव्याचा खर्च आणि गर्दी पाहता, अनेकांना विचार येतो – काही पर्याय आहे का?तर हो! कोकणातील दापोली हा एक असाच पर्याय आहे – गोव्यापेक्षा स्वस्त, शांत, स्वच्छ आणि निसर्गरम्य!चला तर मग, पाहूया उन्हाळ्यात का दापोली हे एक परफेक्ट डेस्टिनेशन आहे आणि तिथे काय काय पाहायला मिळतं.

दापोली

दापोली हे रत्नागिरी जिल्ह्यातलं एक सुंदर पर्यटन स्थळ आहे. समुद्रकिनारे, डोंगराळ परिसर, ऐतिहासिक स्थळं, वन्यजीव, आणि शांतता… हे सगळं एकत्र हवं असेल तर दापोली हा बेस्ट ऑप्शन आहे. विशेष म्हणजे, येथील पर्यटन खर्च गोव्याच्या निम्म्याहून कमी आहे.

दापोलीमध्ये काय पाहाल?

  1. मुरुड समुद्रकिनारा

दापोलीपासून अगदी जवळ. स्वच्छ, गर्दीपासून लांब आणि सूर्यास्तासाठी परफेक्ट. येथील नारळाच्या झाडांमधून वाहणारा वारा मन शांत करतो.

  1. कर्दे बीच

खूप कमी लोकांना माहित असलेला “Hidden Gem”. इथं समुद्राच्या लाटा, शंख-शिंपल्यांनी भरलेला किनारा आणि शांतता – यामुळे इथे वेळ घालवणं म्हणजे थेरपीच!

  1. सुवर्णदुर्ग किल्ला

समुद्रात बांधलेला ऐतिहासिक किल्ला. नौकाविहार करत सुर्वणदुर्गपर्यंत जाता येतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नौदल सामर्थ्याचं हे प्रतीक आहे.

  1. पन्हाळे काजू फॉर्म आणि मॅंगो टूर

थेट शेती पाहायची आणि आंबा/काजू खरेदी करायचे असेल, तर दापोलीचा हा अनुभव खास असतो.

  1. कुनकेश्वर मंदिर व कड्याचे धबधबे

कुनकेश्वर हे श्री शिवाचे पुरातन मंदिर आणि तिथून दिसणारे समुद्राचे दृश्य मन मोहून टाकते.

  1. डॉल्फिन`सफारी

दापोलीच्या मुरुड आणि हर्णै किनाऱ्यावरून तुम्ही डेलफिन सफारीसाठी जाऊ शकता. दिवेआगर किंवा गोव्यासारखा आनंद इथंही मिळतो!

दापोलीचे स्टे ऑप्शन्स , गोव्याच्या निम्म्या किमतीत

दापोलीमध्ये होमस्टे, रिसॉर्ट्स, बीच व्ह्यू कॉटेजेस हे अगदी ₹800 पासून सुरू होतात. गोव्यात याच प्रकारचा अनुभव घ्यायला 2x ते 3x खर्च येतो.

खाण्यापिण्याची मजा – सी फूड स्वस्त आणि चविष्ट!

फ्रेश मासे, सुरमई, बांगडा, कोळंबी – आणि तेही पारंपरिक कोकणी चवीनं बनवलेलं. दापोलीत फिश थाळी ₹200-300 मध्ये सहज मिळते, जी गोव्यात ₹600-800 दरम्यान असते.

पोहोचायचं कसं?

रेल्वेने – खेड किंवा मंडणगड स्टेशन हे जवळचं.

बस/खाजगी गाडीने – मुंबई, पुणे, कोल्हापूरहून 6-7 तासांचा प्रवास.

रोडट्रिपचा आनंद – घाटवाटेतील निसर्ग अप्रतिम!

का निवडाल दापोली?

दापोलीचा विचार करत असाल तर त्याचं कारण अगदी सोपं आहे इथे गोव्यापेक्षा कमी खर्चात, अधिक चांगला अनुभव मिळतो! गोव्याच्या तुलनेत दापोलीमध्ये खर्च खूपच कमी आहे. राहण्यापासून खाण्यापिण्यापर्यंत आणि फिरण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट किफायतशीर असते. गोव्यातील समुद्रकिनारे पर्यटकांनी ओसंडून वाहतात, तिथेच दापोलीमध्ये फार कमी गर्दी असते, त्यामुळे शांत आणि निवांत अनुभव घेता येतो.

स्वच्छता हा आणखी एक मोठा प्लस पॉइंट गोव्यातील काही ठिकाणी कचरा दिसतो, पण दापोलीचे समुद्रकिनारे आणि परिसर अत्यंत स्वच्छ आणि देखणा आहे. नैसर्गिक सौंदर्य बाबतीत दोन्ही ठिकाणं सुंदर आहेत, पण दापोलीचं निसर्गाशी असलेलं घट्ट नातं आणि अजूनही निळसर लाटांत हरवलेलं सौंदर्य हे अनेक वेळा गोव्यालाही मागे टाकतं.

शेवटी, ट्रॅव्हल खर्च पाहिलात तर दापोली मुंबई आणि पुण्यापासून जवळ असल्यामुळे गोव्याच्या तुलनेत प्रवासही सुलभ आणि कमी खर्चिक आहे. त्यामुळे या उन्हाळ्यात ट्रॅव्हलचा प्लॅन करत असाल, तर “गोवा नाही, दापोली!” हा विचार नक्की करा.