All New Honda Amaze भारतात लाँच; पहा किंमत अन फीचर्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । होंडाने आपली ऑल न्यू होंडा अमेझ (All New Honda Amaze) भारतात लाँच केली आहे. बऱ्याच दिवसापासून ग्राहकवर्ग हि गाडी कधी लाँच होते याची वाट पाहत होता . अखेरी हि गाडी लाँच झाली आहे. या गाडीच्या आतील आणि बाहेरील फीचर्समुळे लोक भारावून गेले आहेत. डिझाईन्स, मॉडर्न फीचर्स, आणि अ‍ॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टमसारख्या सेगमेंट-फर्स्ट तंत्रज्ञानासह सज्ज असलेल्या या कारची किंमत 799900 रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होत आहे . ग्राहकांनी मोठ्या उत्सुकतेने वाट पाहिलेल्या या कॉम्पॅक्ट सेडानसाठी टेस्ट ड्राइव्हसुद्धा सुरू झाल्या आहेत.

डायमेंशन्स आणि डिझाईन –

नवीन होंडा अमेझची लांबी 3995 मिमी, रुंदी 1733 मिमी, उंची 1500 मिमी असून व्हीलबेस 2470 मिमी आहे. 172 मिमी ग्राउंड क्लीयरन्स आणि 416 लीटर बूट स्पेसमुळे ही कार प्रवासासाठी अतिशय सोयीस्कर आहे. बाहेरील डिझाईनमध्ये आयकॉनिक लाइट्स आणि स्ट्रॉंग फेस डिझाईन कॉन्सेप्टवर आधारित ही कार आकर्षक आणि बोल्ड दिसते. LED प्रोजेक्टर हेडलाइट्स, डायमंड-कट R15 अलॉय व्हील्स, आणि शार्क फिन अँटेना यामुळे कारचे लूक अधिकच खास बनले आहे.

फीचर्स – All New Honda Amaze

होंडाने नवीन अमेझमध्ये एलिट बूस्ट अप इंटीरियर संकल्पनेचा वापर केला आहे. प्रीमियम बेज आणि ब्लॅक ड्युअल टोन कलर, 8 इंच एचडी डिस्प्ले ऑडिओ, वायरलेस ऍपल कारप्ले व अँड्रॉइड ऑटो, तसेच पीएम 2.5 केबिन एयर फिल्टर यांसारखी वैशिष्ट्ये प्रवासाचा अनुभव आरामदायक बनवतात. होंडा अमेझमध्ये 6 एअरबॅग्स, 3 पॉइंट सीट बेल्ट्स, व्हेइकल स्टॅबिलिटी असिस्ट, हिल स्टार्ट असिस्ट, ABS, EBD, आणि इमर्जन्सी स्टॉप सिग्नल यांसारखी 28 हून अधिक आधुनिक सुरक्षा दिला आहेत.

होंडा अमेझ विविध रंगात उपलब्ध –

नवीन होंडा अमेझ (All New Honda Amaze) विविध रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे, ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या पसंतीनुसार कार निवडण्याची संधी मिळते. या कारमध्ये एकूण 6 आकर्षक रंग पर्याय आहेत, ज्यात ओब्सिडियन निळा पर्ल, रेडियंट लाल मेटॅलिक, प्लॅटिनम पांढरा पर्ल, गोल्डन ब्राऊन मेटॅलिक, मीटिओरॉइड ग्रे मेटॅलिक आणि लूनर सिल्व्हर मेटॅलिक समाविष्ट आहेत. या रंगांमुळे अमेझ अधिक आकर्षक आणि आधुनिक दिसते.

किंमत –

V MT ची किंमत 799900रुपये , VX MT ची किंमत 909900 आणि ZX MT ची किंमत 969900 आहे. त्याचबरोबर CVT ट्रान्समिशनसह V CVT वेरिएंटची किंमत 919900, VX CVT ची किंमत 999900 आणि ZX CVT वेरिएंटची किंमत 1089900 ठेवण्यात आली आहे. विविध वेरिएंट्समुळे ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार पर्याय निवडण्याची संधी मिळणार आहे.