Amazon Deals : आजकाल प्रत्येकजण घाई गडबडीत असतो अशावेळेला कपडे धुण्यासाठी वेळ घालण्याऐवजी वॉशिंग मशीन वापरणे पसंत करतात . आजकाल, LG पासून Voltas पर्यंत, अनेक कंपन्यानी उत्कृष्ट वैशिष्ट्यांसह वॉशिंग मशीन विक्रीसाठी उपलब्ध करतात. अनेक कंपन्या स्वस्त दरात वॉशिंग मशीनही देतात. आज या लेखात आम्ही तुम्हाला लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट (Amazon Deals) Amazon वर 9 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध असलेल्या वॉशिंग मशिन्सबद्दल सांगणार आहोत.
Power Guard 6.5 kg (Amazon Deals)
हे पॉवर गार्ड 6.5 किलोचे वॉशिंग मशीन Amazon वर 6,590 रुपयांना उपलब्ध आहे. तुम्ही ते 320 रुपयांच्या मासिक हप्त्यावर देखील खरेदी करू शकता. या सेमी ऑटोमॅटिक मशिनमध्ये ३ ते ४ लोकांचे कपडे आरामात धुता येतात. यासोबत कंपनी दोन वर्षांची वॉरंटी देते. वॉशिंग मशीनमध्ये शक्तिशाली 360W मोटर आहे. त्याचा आकार 8D x 48W x 87H आहे. हे मशीन पांढरे-लाल रंग संगतीत येते. महागडे (Amazon Deals) मशिन्स तुम्ही घेतले तर त्यासाठी मेंटेन सुद्धा चांगल्या प्रकारे करावे लागतात. या मशीनला म्हणावा तितका मेंटेनन्स नाही. याला कपडे वळवण्यासाठी वेगळा खास ड्रायर येतो जो तुम्ही वेगळा केवळ कपडे सुकवण्यासाठी वापरू शकता. ज्यासाठी पूर्ण वॉशिंग प्रोग्रॅम लावायची गरज नसते.
Midea 7.5 KG सेमी ऑटोमॅटिक (Amazon Deals)
हे देखील एक सेमी ऍटोमॅटिक वॉशिंग मशीन आहे. या 7.5 किलो वॉशिंग मशीनमध्ये 4-5 लोकांचे कपडे सहज धुता येतात. त्याचा आकार 42.5D x 74.5W x 96.5H आहे. हे टॉप लोड वॉशिंग मशीन आहे. हे वॉशिंग मशीन IPX4 रेटिंगसह येते. (Amazon Deals) Amazon वर मशीनची किंमत 8,690 रुपये आहे. यावर 200 रुपये कूपन डिस्काउंट आहे. 421 रुपयांच्या मासिक हप्त्यावरही मशीन खरेदी करता येईल. वॉशिंग मशीन पांढऱ्या-लाल रंगात येते. या मशीनचे एक मोठे वैशिष्टय म्हणजे कधीकधी कपडे कमी असले तरी ऍटोमॅटिक मशीन कडून जास्त पाणी घेतले जाते. मात्र हे मशीन सेमी ऍटोमॅटिक असल्याने कपड्याच्या गरजेनुसार तुम्ही पाणी यात घालू शकता. त्यामुळे पाण्याची बचत होईल.