राज्यातील ‘या’ मुली-मुलांना दर महिन्याला मिळणार 6000 रुपये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य सरकारने राज्यातील मुला-मुलींसाठी मोठी घोषणा केली आहे. ज्या मुलामुलींना वसतीगृह मिळालेलं नाही अशा विद्यार्थ्यांना सरकार निर्वाह भत्ता (Subsistence Allowance Girl And Boys) देणार आहे. त्यानुसार, महानगरात राहणाऱ्यांना 6 हजार, तर इतर शहरात राहणाऱ्या दर महिन्याला 5 हजार 300 रुपये तर तालुका स्तरावर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा 3 हजार 800 रुपये भत्ता दिला जाणार आहे. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी याबाबत घोषणा केली आहे.

चंद्रकांत पाटील सध्या सोलापूर दौऱ्यावर असून ते म्हणाले, 1 जून पासून उच्च शिक्षण घेणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व मुलींची 100 टक्के फी राज्य सरकार भरणार आहे. महाराष्ट्रातील मुलींना फी नसल्यामुळे शिकता येत नाही असे होणार नाही. मुलींच्या फीसाठी आम्ही 1 हजार कोटी रुपयांची तरतूद करणार आहोत. मंत्रिमंडळाच्या उपसमितीमध्ये याबाबतचा निर्णय झाला असून लवकरच कॅबिनेटचा निर्णय होऊन जीआर निघणार आहे. त्याचबरोबर ज्या मुला-मुलींना वसतिगृह मिळालेले नाही अशांना निर्वाह भत्त्याची तरतूद करण्यात येणार आहे.

त्यांनुसार, महानगरातील म्हणजे मेट्रो सिटीमधील विद्यार्थी-विद्यार्थीनीना प्रति महिना 6 हजार रुपये, त्यापेक्षा छोट्या शहरांमध्ये 5 हजार 300 तर तालुका स्तरावर 3 हजार 800 रुपये दर महिन्याला निर्वाह भत्ता मिळणार आहे. हा भत्ता डिबीटीद्वारे थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात देण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे शिक्षणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढेल अशी आशा आहे. पंतप्रधान मोदींनी पीएम उच्चस्तर शिक्षा अभियानाच्या माध्यमातून देशातील विद्यापीठांना 3 हजार 800 कोटी रुपये निधी दिला आहे. तर महाविद्यालयांना 5 हजार कोटी रुपये जाहीर होणार आहे. नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील तेव्हा ज्या विद्यापीठामध्ये शंभर कोटींपेक्षा अधिकचा निधी वापरला जाईल असेही मानती पाटील यांनी म्हंटल.