Amazon Great Summer Sale : फक्त 349 रुपयांत iPhone सारखा मोबाईल; Amazon वर खास ऑफर

Amazon Great Summer Sale
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध ब्रँड Apple चा iPhone कोणाला आवडत नाही? प्रत्येकालाच आयफोनचे आकर्षण असत… परंतु आयफोनची किंमत जास्त असल्याने प्रत्येकालाच तो खरेदी करणं शक्य होत नाही… तुम्हालाही आयफोनचा लूक आवडत असेल तर आज आम्ही तुम्हाला अशा एका डील बाबत सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही फक्त ३४९रुपयांत iPhone सारखा दिसणारा मोबाईल खरेदी करू शकता… चेष्टा नाही मित्रानो, लोकप्रिय इ कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर सध्या ग्रेट समर सेल (Amazon Great Summer Sale) सुरु आहे… या सेलच्या माध्यमातून मोबाईल, लॅपटॉप, स्मार्ट टीव्ही तुम्ही अगदी स्वस्तात खरेदी करू शकता. आता आपण येउयात मूळ मुद्द्यावर, तो म्हणजे फक्त ३४९ रुपयांत iPhone सारखा दिसणाऱ्या मोबाईल बद्दल..

काय आहे ऑफर? Amazon Great Summer Sale

तर मित्रानो, आम्ही तुम्हाला ज्या मोबाईल बद्दल सांगत आहोत त्याच नाव आहे Tecno POP 9… हा स्मार्टफोन दिसायला अगदी आयफोन सारखा आहे.. लांबून जरी कोणी बघितला किंवा जवळून जरी बघितला तरी समोरच्या व्यक्तीला तो आयफोनच वाटेल अशा पद्धतीने त्याला बनवण्यात आलं आहे. Tecno च्या या मोबाईलची मूळ किंमत ८४९९ असून ऍमेझॉनच्या ग्रेट समर सेलमध्ये (Amazon Great Summer Sale) तो ६०९९ रुपयांना लिस्ट करण्यात आला आहे… परंतु महत्वाची बाब म्हणजे या मोबाईल वर ५७५० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देण्यात आली आहे. म्हणजेच काय तर तुम्ही तुमचा जुना मोबाईल देऊन हा नवा मोबाईल खरेदी करू शकता. परंतु त्यासाठी तुमचा मोबाईल व्यवस्थित कंडिशन मध्ये असावा.

Tecno POP 9 चे खास फीचर्स –

Tecno POP 9 मध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.67 इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेला 1612 x 720 पिक्सल रिझोल्युशन मिळते. स्मार्टफोन मध्ये MediaTek Helio G50 प्रोसेसर वापरण्यात आला असून हा मोबाईल एंड्रॉयड 14 गो एडिशन वर आधारित HiOS 14 या ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतो. Tecno च्या या स्मार्टफोन मध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि IR सेन्सर देण्यात आलेत. या मोबाईल मध्ये 13MP चा मुख्य कॅमेरा आणि 8MP फ्रंट कॅमेरा मिळतो. पॉवरसाठी यामध्ये 5000mAh बॅटरी बसवण्यात आली आहे. मोबाईलच्या IP54 रेटिंगमुळे फोनला पाणी आणि धूळ प्रतिरोधक संरक्षण मिळतं. कनेक्टिव्हिटी साठी यामध्ये डुअल सिम स्लॉट, वाय-फाय, जीपीएस, ब्लूटूथ, ऑडिओ जॅक आणि USB टाइप-सी पोर्ट सारखे फीचर्स मिळतात. कंपनी 2 वर्षांपर्यंत ग्राहकांना सिक्योरिटी अपडेट देतेय.