Amazon Hot Summer Sale : Amazon वर सुरु झालाय HOT Summer सेल; एसी, फ्रिज मिळणार थेट अर्ध्या किंमतीत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Amazon Hot Summer Sale) कडाक्याचा उन्हाळा सुरू झाल्यापासून घराघरातील पंखे, एसी दिवसभर सुरु आहेत. त्यात फ्रिजमधील थंडगार पाण्याशिवाय सुखावल्यासारखं वाटत नाही. उन्हाळ्याच्या दिवसात खऱ्या अर्थाने एसी आणि फ्रिजसारख्या उपकरणांची गरज भासू लागते. अशातच देशभरातील अनेक लोकांची आवडती ऑनलाईन शॉपिंग साईट Amazon वर नुकताच हॉट समर सेल सुरु झाला आहे. ज्यामध्ये एसी, रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीनसारखी उपकरणे मोठ्या सवलतीत विकली जात आहेत.

Amazon हॉट समर सेल (Amazon Hot Summer Sale)

कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर ॲमेझॉनने हॉट समर सेलची घोषणा केली आहे. दिनांक ९ एप्रिल २०२४ पासून ते १४ एप्रिल २०२४ पर्यंत हा सेल सुरु राहणार आहे. ज्यामध्ये ग्राहकांना उन्हाळ्यात वापरल्या जाणाऱ्या उपकरणांवर जवळपास ५५ टक्के सूट दिली जात आहे. त्यामुळे जर तुम्ही या उन्हाळ्यात एसी किंवा फ्रीज घेण्याचा विचार करत असाल तर हीच ती योग्य वेळ. कारण या सेलमध्ये ग्राहकांना एसी, फ्रीज आणि वॉशिंग मशीन मोठ्या सवलतीसह खरेदी करता येणार आहेत. चला तर या सेलमधील ऑफर आणि सवलतींची सविस्तर माहिती घेऊया.

१५ हजार रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर

Amazon या ऑनलाईन शॉपिंग साईटच्या लाइव्ह पेजवर पाहिले असता समजत आहे की, या सेल दरम्यान ५ हजार रुपयांपर्यंतची बँक सूट मिळत आहे. (Amazon Hot Summer Sale) सोबतच ग्राहकांना १५ हजार रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफरदेखील दिली जातेय. या सेलमध्ये वस्तू खरेदी करताना HDFC, J&K, SBI, DBS, OneCard आणि HSBC बँकेचे कार्ड्स वापरता येतील.

AC वर बंपर सवलत

ॲमेझॉनच्या हॉट समर सेलमध्ये एसीवर चांगली सवलत दिली जातेय. यामध्ये हायर कंपनीचा १.५ टनचा ५ स्टार एसी ४४,४९० रुपयांना खरेदी करता येईल. याची मूळ किंमत ७८,००० रुपये आहे. तर सॅमसंग कंपनीचा २ टनचा ३ स्टार एसी ५४,४९० रुपयांना खरेदी करता येईल. ज्याची मूळ किंमत ८३,९९० रुपये इतकी आहे. (Amazon Hot Summer Sale)

याशिवाय एलजी कंपनीचा १.५ टनचा ३ स्टार एसी ३७,४९० रुपयांना खरेदी करता येईल. ज्याची मूळ किंमत ७८,९९० रुपये इतकी आहे. तर गोदरेज कंपनीचा १.२५ टनचा ३ स्टार एसी ४१,९९० रुपयांना आणि कॅरियर कंपनीचा १.५ टनचा ३ स्टार एसी ३४,९९० रुपयांना खरेदी करता येईल. ज्याची मूळ किंमत ६७,७९० रुपये इतकी आहे.

रेफ्रिजरेटरच्या किंमतीत मोठी सूट

ॲमेझॉनच्या हॉट समर सेलमध्ये एलजी कंपनीचा २७२ लिटरचा ३ स्टार फ्रिज २८,९९० रुपयांना खरेदी करता येत आहे. तर सॅमसंग कंपनीचा ५८० लिटरचा फ्रिज ७४,९९० रुपयांना खरेदी करता येईल. (Amazon Hot Summer Sale) ज्याची मूळ किंमत ८७,९९० रुपये इतकी आहे. याशिवाय सॅमसंग कंपनीचा १८३ लिटरचा ५ स्टार एसी १६,३९० रुपयांना खरेदी करता येत आहे. तसेच हायर कंपनीचा २३७ लिटरचा ३ स्टार रेफ्रिजरेटर २५,३९० रुपयांना आणि गोदरेज कंपनीचा १८० लिटरचा ५ स्टार फ्रिज १५,९९० रुपयांना खरेदी करता येईल.

वॉशिंग मशीनही स्वस्तात

ॲमेझॉनच्या हॉट समर सेलमध्ये एसी, रेफ्रिजरेटरसारखीच वॉशिंग मशीनवर देखील मोठी सवलत दिली जात आहे. त्यामुळे या सेलच्या माध्यमातून जे ग्राहक वॉशिंग मशीन घेऊ इच्छित आहेत त्यांच्यासाठी ही वेळ अगदी उत्तम आहे. कारण हा सेल कमी किमतीत चांगल्या कंपनीच्या वॉशिंग मशीन उपलब्ध करून देत आहे. (Amazon Hot Summer Sale)

यामध्ये सॅमसंग कंपनीची ८ किलोची ५ स्टार मशीन १९,९९० रुपयांना तर हायर कंपनीची ८ किलोची ५ स्टार मशीन २९, ९९० रुपयांना खरेदी करता येईल. याशिवाय IFB कंपनीची ६ किलोची ५ स्टार मशीन २३,९९० रुपयांना आणि व्हरपूल कंपनीची ७.५ किलोची ५ स्टार वॉशिंग मशीन १७,९९० रुपयांना खरेदी करता येईल.