Amazon चा मोठा निर्णय!! विक्रेत्यांना होणार फायदा तर ग्राहकांनाही मिळणार स्वस्त दरात उत्पादने

Amazon
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| ई-कॉमर्स क्षेत्रात सतत नावीन्यपूर्ण निर्णय घेणाऱ्या अमेझॉनने (Amazon) आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. येत्या 7 एप्रिल 2025 पासून अमेझॉन आपल्या प्लॅटफॉर्मवरील 1.2 कोटींहून अधिक उत्पादनांसाठी रेफरल शुल्क रद्द करणार आहे. या निर्णयामुळे लहान व्यापारी व विक्रेत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच ग्राहकांनाही अधिक स्वस्त दरात उत्पादने खरेदी करता येणार आहेत.

लहान विक्रेत्यांना होणार मोठा फायदा

यापूर्वी Amazon ने 500 रुपयांपेक्षा जास्त इन्स्टंट बँक डिस्काउंटवर 49 रुपये प्रोसेसिंग फी लागू केली होती. मात्र, आता 300 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या उत्पादनांसाठी कोणतेही रेफरल शुल्क आकारले जाणार नाही. या धोरणामुळे लहान व मध्यम विक्रेत्यांसाठी ऑनलाइन विक्री करणे अधिक फायदेशीर ठरणार आहे.

कोणत्या उत्पादनांना लाभ मिळेल?

हा बदल 135 हून अधिक उत्पादन श्रेणींमध्ये लागू होणार आहे. यामध्ये कपडे, शूज, होम डेकोर, ब्युटी प्रोडक्ट्स, दागिने, किराणा सामान, खेळणी आणि किचन उत्पादने यांचा समावेश आहे. सध्या या उत्पादनांवर विक्रेत्यांना 2% ते 16% कमिशन द्यावे लागते, मात्र आता ते पूर्णपणे रद्द होणार आहे. त्यामुळे विक्रेत्यांना अधिक नफा मिळेल आणि ग्राहकांसाठीही वस्तूंच्या किमती कमी होतील.

शिपिंग शुल्कात कपात, विक्रेत्यांना मोठा दिलासा

Amazonने विक्रेत्यांच्या शिपिंग शुल्कातही मोठी कपात केली आहे. याअंतर्गत, विक्रेत्यांसाठी शिपिंग शुल्क 77 रुपयांवरून 65 रुपयांपर्यंत कमी करण्यात आले आहे. तसेच, 1 किलोपेक्षा कमी वजनाच्या उत्पादनांसाठी वजन हँडलिंग शुल्क 17 रुपयांनी कमी होईल. मोठ्या प्रमाणात माल पाठवणाऱ्या विक्रेत्यांना 90% पर्यंत सेल चार्जमध्ये सवलत मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, Amazon च्या नव्या धोरणामुळे अधिकाधिक विक्रेत्यांना ऑनलाइन व्यापारात संधी मिळणार आहे. खास म्हणजे, लहान आणि नवीन व्यावसायिकांसाठी हा मोठा फायदा ठरणार आहे. परिणामी यामुळे अमेझॉनवर विक्री होणाऱ्या उत्पादनांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. रेग्युलेटरी स्क्रूटनीच्या पार्श्वभूमीवर निर्णय एका

महत्वाचे म्हणजे, विक्रेत्यांसाठी रिफरल आणि शिपिंग शुल्क हा एकूण सेल चार्जच्या 90 ते 95% पर्यंतचा भाग असतो. ही बाब लक्षात घेऊनच.300 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या उत्पादनांवरील रेफरल शुल्क हटवण्याचा निर्णय अमेझॉनने घेतला आहे. ज्यामुळे अमेझॉनचा हा निर्णय विक्रेत्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.