महाबळेश्वर – पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाट सर्व प्रकारच्या वाहतूकीसाठी 15 दिवस बंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा – पोलादपूर-महाबळेश्वर (आंबेनळी घाट) हा सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचे निर्देश रायगड – अलिबागच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यामुळे आंबेनळी घाट सर्व प्रकारच्या वाहतूकीसाठी पुढील १५ दिवसांकरीता बंद करण्यात आलेला आहे.

दर पंधरा दिवसांनी आढावा घेण्याचे आदेश

पाऊस, भुस्खलन, दरड कोसळणे इत्यादी परिस्थितीचा दर १५ दिवसांनी सविस्तर आढावा घेण्याचे निर्देश पोलीस आणि महसूल प्रशासनाला दिले आहेत. हा घाट बंद ठेवण्याच्या अनुषंगाने स्वयंस्पष्ट अहवाल रायगड-अलिबाग पोलीस अधीक्षक कार्यालय आणि महाड प्रांत कार्यालयाने सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या असल्याची माहिती अपर जिल्हादंडाधिकारी संदेश शिर्के यांनी दिली आहे.

४५ दिवस घाट होता बंद

आंबेनळी घाट २०२१ मध्ये जुलै महिन्यात ४५ दिवस बंद ठेवण्यात आला होता. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या तर काही ठिकाणी रस्ते वाहून गेले होते. त्यावेळी तब्बल ४५ दिवस घाट दुरुस्तीचे काम सुरू होते. काम सुरू असतानाही अधूनमधून दरडी कोसळत होत्या.

केळघर घाटात दरड कोसळली

महाबळेश्वर-केळघर परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे महाबळेश्वर-सातारा मार्गावरील केळघर घाटात दरड कोसळली आहे. या घटनेमुळे घाटातील वाहतूक काहीकाळ बंद ठेवण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम उपविभागामार्फत दरड काढण्याचे काम सुरु आहे. सध्या या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे.