Ambolgad Beach | आपल्या महाराष्ट्राला सुंदर असा समुद्रकिनारा लाभलेला आहे. महाराष्ट्रात अनेक वेगवेगळ्या सिक्रेट बीच आहेत. त्याबद्दल अनेक लोकांना माहिती देखील नाही. महाराष्ट्रात असे एक गाव आहे, ज्या गावात चंद्रकोर आकाराचा एक छुपा समुद्रकिनारा आहे. या समुद्राचा आकार मुंबईतील मरीन ड्राईव्ह प्रमाणे क्वीन नेकलेस सारखा दिसतो. हा समुद्रकिनारा कोकणातील रत्नागिरी या जिल्ह्यात आहे. राजापूर तालुक्यात हा समुद्र किनारा आपल्याला दिसतो.
कोकणातील आंबोळगड (Ambolgad Beach) या गावात हा समुद्रकिनारा आहे. आंबोळगड हे किल्ल्यासाठी आणि श्री गगनगिरी स्वामींच्या मठासाठी प्रसिद्ध आहे. परंतु या आंबोळगड गावातील समुद्रकिनाऱ्यांना जास्त गर्दी नसते. त्यामुळे या ठिकाणी एकांत अनुभवता येतो. आणि निसर्गाचा सुंदर असा अनुभव देखील घेता येतो.
आंबोळगड हे गाव रत्नागिरी शहरांपासून 57 किलोमीटर आणि राजापूर पासून 36 किलोमीटर अंतरावर आहे. हे गाव तिन्ही बाजूने अरबी समुद्राने वेढलेली आहे. गावाची एक बाजू पठाराच्या दिशेने नाटे या गावाशी जोडलेली आहे. राजापूर तालुक्यात दोन किनारी किल्ले आपल्याला पाहायला मिळतात. यातील एकाचे नाव आहे आंबोळगड आणि दुसऱ्याचे नाव आहे यशवंतगड असे आहे. किल्ल्यात एक तुटलेली तोफ एवढेच आहे. याव्यतिरिक्त त्या ठिकाणी काहीही पाहायला मिळत नाही. किल्ल्याजवळच्या सड्यावर गगनगिरी महाराजांचा मठ देखील आहे.
आंबोळगड या गावांमध्ये दोन स्वच्छ आणि सुंदर असे समुद्रकिनारी आहेत. या ठिकाणी अनेक पर्यटक भेट देत असतात. परंतु अजूनही अनेक लोकांना या समुद्रकिनाऱ्याचे सौंदर्य माहिती नाही. त्यामुळे गर्दी देखील मर्यादित असते. तुम्हाला जर या ठिकाणी जायचे असेल, तर रत्नागिरी या शहरातून आंबोळगड पर्यंत जाण्यासाठी थेट एसटी बस आहे. ही बस तुम्हाला आंबोळगड किल्ल्यापर्यंत पोहोचवते. अशाप्रकारे तुम्हाला जर महाराष्ट्रातील या सुंदर आणि लपलेल्या समुद्रकिनाऱ्याला भेट द्यायची असेल, तर तुम्ही नक्की देऊ शकता.