आंबोली घाट : खिलारे खून प्रकरणात सातारा, सांगली जिल्ह्यातील 7 जणांना अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सावंतवाडी | कराड येथे दहा दिवस पंढरपूर येथून एकाला अर्थिक देवाणघेवाणीच्या व्यवहारातून आणल्यानंतर ठेवण्यात आले होते. त्यानंतर बेदम मारहाणीत मुकादम सुशांत खिल्लारे याच्या खून झाला. या प्रकरणी पोलिस कोठडीतील संशयितांची संख्या आता 7 वर पोहचली आहे. कराड येथील 3 जणांसह सांगली जिल्ह्यातील 4 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. सांगलीतील चार संशयितांना सोबत घेऊन सावंतवाडीच्या पोलिस उपअधीक्षक डॉ. रोहिणी सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक वाळवा-इस्लामपूर (जि. सांगली) येथे रवाना झाले होते. खिल्लारे याच्या खुनात आतापर्यंत सात जण असल्याचे निष्पन्न झाले असून, यात पैशांसाठीच खून केल्याची कबुली संशयितांनी दिल्याची माहिती तपासी अधिकारी डॉ. सोळंके यांनी दिल्ली.

पंढरपूर येथील सुशांत खिल्लारे याच्या खून प्रकरणात सहभागी असणाऱ्या एकूण सात संशयितांपैकी मुख्य संशयित भाऊसो माने याचा आंबोली घाटातील खोल दरीत पडून मृत्यू झाला. त्यानंतर या गुन्ह्यात तुषार पवारसह अन्य पाच जणांना तपासात पोलिसांनी अटक केली असून अजूनही पोलिस अधिक तपास करित आहे.

दारूच्या नशेत सुशांत खिल्लारेला झालेल्या बेदम मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झाला होता. यात माने याच्या चुलत भावासह वाळवा, इस्लामपूर येथील संशयितांचा समावेश होता. तपासात ही नावे उघड झाल्यानंतर त्या सर्वांच्या मुसक्या आवळल्या. नव्याने अटक सर्व भाऊसो माने याचे मित्र आहेत. दिवसभर सांगली येथे पोलिसांनी तपास केला. नव्याने ताब्यात घेतलेले पाचही संशयित पोलिस कोठडीत असून, त्यांच्याकडून पोलिस अधिक तपास करीत आहेत. नव्याने अटक केलेले संशयित सांगली जिल्ह्यातील वाळवा-इस्लामपूरमधील असून, ते सर्व भाऊसो माने याचे मित्र आहेत. त्यांना सोबत घेऊन तपासासाठी पोलिसांचे पथक इस्लामपूर- वाळवा येथे तपासासाठी रवाना झाले.