फर्स्ट क्लास टॉयलेट वापरायला दिले नाही म्हणून प्रवाशाचा फ्लाइट अटेंडंटवर हल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वॉशिंग्टन :वृत्तसंस्था – सध्या सोशल मीडियावर भांडणाचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. लोक कुठे आणि कोणत्या कारणावरून भांडतील याचा काही नेम नाही हे हा व्हिडिओ पाहून आपल्या नक्कीच लक्षात येईल. हा भांडणाचा व्हिडिओ चक्क विमानातील (fight) आहे. आता लोकांनी उडत्या विमानात (fight) देखील भांडणाचे सोडले नाही. या व्हिडिओमध्ये चक्क एका प्रवाशाने फ्लाईट अटेंडेंट वरच हात उचलला आहे.

या व्यक्तीला फर्स्ट क्लास टॉयलेट वापरायचे होते मात्र फ्लॅट अटेंडेंटने या व्यक्तीला नकार दिल्याने हा वाद सुरू झाला. आपण व्हिडिओत पाहू शकता हा प्रवासी फ्लाईट अटेंडंटच्या डोक्यात बुक्क्या मारत आहे. तो त्याला बुक्क्या मारून मागे पळून जातो. इतक्यात फ्लाईट अटेंड प्रशासकीय पथकाकडे फोनवरून सगळी घडलेली बाब सांगतो. ही घटना घडल्यानंतर हे विमान (fight) लॉस एंजलिस विमानतळावर उतरवल्यावर या व्यक्तीला अटक करण्यात आली.

ही घटना अमेरिकन एअरलाइन्स फ्लाईट 377 मधली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा व्यक्ती एअरलाइनच्या विमानातून (fight) लॉस एंजलिस ला जात होता.हा व्यक्ती मेक्सिकोच्या लॉस कॉबोस मधून विमानात चढला होता. या संपूर्ण घटनेनंतर अमेरिकन एअरलाइन्स कंपनीने या व्यक्तीवर आजीवन विमान प्रवासावर बंदी घातली आहे.

हे पण वाचा :
वेदांतानंतर आता फोन पे महाराष्ट्रातून बाहेर पडणार
आकाशात विमान झेपावताच विमानातून उडाल्या ठिणग्या, Video आला समोर
टेलिकॉम कंपन्यांच्या ‘या’ सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन्सविषयी जाणून घ्या
RBI कडून आणखी एका सहकारी बँकेचे लायसन्स रद्द !!!
‘या’ 2 बँकांमधील ज्येष्ठ नागरिकांसाठीची एफडी योजना 1 ऑक्टोबरपासून बंद होणार