अमेरिकेतील गोंधळामुळे बँकिंग क्षेत्रातील Mutual Funds मध्ये एका आठवड्यात सहा टक्क्यांनी घसरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Mutual Funds : अमेरिकेतील बँकिंग सेक्टरमध्ये सध्या जोरदार गोंधळ सुरु आहे. ज्यामुळे सिलिकॉन व्हॅली बँक आणि सिग्नेचर बँकेसारख्या मोठ्या बँक अक्षरशः कोसळल्या आहेत. ज्याच्या परिणामी गेल्या आठवड्यात बँकिंग आणि वित्तीय सेवा क्षेत्रातील म्युच्युअल फंडस् सहा टक्क्यांपर्यंत खाली आले. अमेरिकेतील या बँकिंग संकटाने जागतिक वित्तीय व्यवस्थेलाच मोठा धक्का दिला आहे. यामुळे आता भारतातही बँकिंग सेक्टर बाबत गुंतवणूकदारांची भावना कमकुवत झाल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थितीत, समीक्षाधीन आठवड्यात बँकिंग शेअर्समध्ये 3-13 टक्क्यांनी घसरण झाली आहे. मात्र, त्याचा थेट परिणाम भारतीय बँकिंग क्षेत्रावर होत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

Mutual funds see Rs 61,809 crore outflows in December, asset base slips | Business News,The Indian Express

बँक शेअर्समध्ये झालेल्या सततच्या विक्रीमुळे या क्षेत्रातील Mutual Funds मध्येही जोरदार घसरण झाली आहे. ACE MF NXT ने गोळा केलेल्या आकडेवारीनुसार, बँकिंग क्षेत्रातील सर्व 16 म्युच्युअल फंडांनी 17 मार्च रोजी संपलेल्या आठवड्यात गुंतवणूकदारांना 1.6 टक्के ते 6 टक्क्यांपर्यंत निगेटिव्ह रिटर्न दिला आहे. या आकडेवारी वरून असे दिसते की, या वर्षी आतापर्यंत या फंडांनी आठ टक्क्यांपासून ते 10 टक्क्यांपर्यंत निगेटिव्ह रिटर्न दिला आहे. American Bank Crisis

What Is A Small-Cap Mutual Fund? Why It Has High Growth Potential And What Are The Risks?

गेल्या आठवड्यात घसरण झालेल्या Mutual Funds मध्ये एचडीएफसी बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस फंड, एलआयसी एमएफ बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस फंड, आदित्य बिर्ला सन लाइफ बँकिंग अँड फायनान्शिअल सर्व्हिसेस फंड, टाटा बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस फंड आणि निप्पॉन इंडिया बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस फंड यांचा समावेश आहे. American Bank Crisis

Mutual funds Regulation In India : All you need to know

FYERS चे रिसर्च प्रमुख असलेल्या गोपाल कवलिरेड्डी यांनी सांगितले की,” बाजारात सुरू असलेली अस्थिरता आणि व्याजदरात वाढ होण्याची शक्यता यामुळे यामध्ये घट झाली आहे. ते असेही म्हणाले की,” या व्यतिरिक्त अनेक बँका आणि वित्तीय क्षेत्रातील संस्थांमधील आपली गुंतवणूक कमी करण्यासाठी परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार (FPIs) विक्री करत आहेत.” Mutual Funds

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.axismf.com/

हे पण वाचा :
Torn Notes : फक्त ‘या’ बँकांमध्येच बदलता येतात फाटक्या नोटा, जाणून घ्या त्यासाठीचे नियम
Gold Price Today : गुढीपाढव्याच्या पार्श्वभूमीवर बाजारात सोने चमकले, तपासा आजचे नवे दर
Realme C35 स्मार्टफोनवर मिळवा आतापर्यंतची सर्वात स्वस्त ऑफर, फीचर्स तपासा
Home Insurance द्वारे अशा प्रकारे मिळेल आपल्या घरातील नुकसानीची आर्थिक भरपाई
Bank of Baroda कडून रिटेल टर्म डिपॉझिट्सवरील व्याजदरात 0.25 टक्क्यांची वाढ, पहा नवीन व्याजदर