अमित शहा आणि शरद पवारांची आज भेट होण्याची शक्यता; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर करणार चर्चा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यात शेती प्रश्नांच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांनी आक्रमणाची भूमिका घेतली आहे. मुख्य म्हणजे सध्या कांदा उत्पादक ऊस उत्पादक आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी आंदोलने सुरू केली आहेत. या सर्व प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दिलेल्या जाऊन केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. तसेच इथेनॉल बंदीचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यामुळे साखर कारखानदारांची समस्या शरद पवार अमित शहा यांच्या पुढे मांडणार आहेत. त्यामुळे आता या भेटीकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, आज शरद पवार आणि अमित शहा यांची भेट होऊ शकते. या भेटीदरम्यान शरद पवार अमित शहांशी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बातचीत करतील. तसेच राज्यात निर्माण झालेला इथेनॉल प्रश्न देखील आम्ही शहा यांच्या पुढे मांडतील. स्वतः शरद पवार यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न अमित शहा यांच्या पुढे मांडल्यामुळे केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने विचार करेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे राज्यांतील शेतकऱ्यांसाठी शरद पवार आणि अमित शहा यांची भेट अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने इथेनॉल बंदीचा निर्णय घेतला आहे. तसेच, कांदा निर्यातीवर बंदी आणली आहे. या सर्व निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखीन वाढ झाली आहे. याआधी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अशाच राज्यात अनेक मुद्दे पेटले असताना शेतकऱ्यांच्या या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे या सर्व प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी अमित शहांची भेट घेण्यासाठी शरद पवार दिल्लीला जाणार आहेत.