अमित शाह उपग्रहाच्या माध्यमातून EVM मशीन नियंत्रित करतात; कोणी केला खळबळजनक आरोप?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) स्वतः उपग्रहाच्या माध्यमातून ‘ईव्हीएम’ (EVM) मशीन नियंत्रित करत आहेत. त्यांनी या कामासाठी माणसे ठेवली आहेत असा खळबळजनक दावा ठाकरे गटाचे नेते आणि औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी केला आहे. ते शिवगर्जना यात्रेच्या माध्यमातून गडचिरोली येथे बोलत होते.

चंद्रकांत खैरे म्हणाले, अमित शाह मोठ्या मोठ्या घोषणा करतात. ते म्हणतात महाराष्ट्रात 48 जागा जिंकू, कशाच्या जोरावर म्हणतात? हे सगळं सॅटेलाइटद्वारे मॅन्युप्युलेट केलं जातंय. त्यामुळे ईव्हीएम मशीन नको, आम्हाला बॅलेट पेपरच हवा अशी मागणी आम्ही करणार आहोत असं चंद्रकांत खैरे यांनी म्हंटल.

शिवसेना फोडण्याचं काम मिंधे गटाने केले आहे आणि देवेंद्र फडणवीसांनी त्यांना स्ट्राँग केलं आहे. भाजपा सर्वच यंत्रणांचा हवा तसा वापर करत आहे, देशभरातील प्रादेशिक पक्षांना संपवण्यासाठी पैशांचा सर्रास वापर सुरू आहे असा आरोपही यावेळी खैरेंनी केला. खैरे यांनी केलेल्या या आरोपावर भाजपकडून काय प्रत्युत्तर येत हे आता पाहावं लागेल.