पवारांमुळे अमित शहांना जामीन मिळाला होता?? सामनातील गौप्यस्फोटाने चर्चाना उधाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रातले ‘यूपीए’ सरकार मोदी व अमित शहांच्या मागे हात धुऊन लागले असताना मोदी व शरद पवारांतील सुसंवादामुळेच अमित शहा यांना गोध्रा हत्याकांडातील एका प्रकरणात जामिनावर मुक्त होण्यास मदत झाली. असा गौप्यस्फोट शिवसेनेने सामनातील रोखठोक सदरातून केला आहे. त्यामुळे चर्चाना उधाण आलं आहे.

सामनातून आज शिवसेनेने महित शाह आणि शिंदे गटावर टीकास्त्र सोडलं आहे. अमित शाह यांच्या मनात महाराष्ट्राविषयीचा द्वेष आहे. खरं तर त्यांनी महाराष्ट्र आणि मराठी माणसांविषयी सदैव कृतज्ञ राहायला हवे. केंद्रातले ‘यूपीए’ सरकार मोदी व अमित शहांच्या मागे हात धुऊन लागले असताना मोदी व पवारांतील सुसंवादामुळेच अमित शहा यांना गोध्रा हत्याकांडातील एका प्रकरणात जामिनावर मुक्त होण्यास मदत झाली. हा गौप्यस्फोट नसून सत्य आहे. आणखी एका प्रकरणात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ‘सरकार’ पद्धतीने भूमिका करून अमित शहा यांना त्या काळात मदत होईल अशी व्यवस्था केली होती. असा गौप्यस्फोट शिवसेनेने सामनातून केला आहे.

तसेच दोन्ही प्रसंगावर स्वतंत्र लिखाण संजय राऊतच करू शकतील. असदेखील सामनातून म्हंटल आहे. या प्रकरणावर शरद पवार आणि उद्धव ठाकरे बोलू शकतील पण त्याच ठाकरे-पवारांविरुद्ध टोकाचे मिशन आज अमित शहा व त्यांचे लोक चालवीत आहेत अशा शब्दात शिवसेनेने सामनातून भाजपवर टीका केली आहे.