शिंदे- अजित पवारांना इतक्या कमी जागा का? अमित शहांनी सांगितलं कारण; बैठकीत नेमकं काय घडलं?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर राज्यातील भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्या महायुतीच्या जागावाटपाचे घोड अजूनही अडलं आहे. भाजप सर्वाधिक ३२ ते ३५ जागांवर लढण्याची शक्यता असून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटाला जास्त जाग मिळण्याची अजिबात शक्यता नाही. यावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही नेते शुक्रवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यां भेटले. मात्र अडीच तास चर्चा करूनही एकही जागा वाढवण्यास भाजप तयार नाही. त्यामुळे अजित पवार आणि एकनाथ शिंदे याना रिकाम्या हाताने मुंबईला परतावे लागलं.

याबाबत द न्यू इंडियन एक्स्प्रेसनं वृत्त दिले आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण ४८ जागा आहेत. यापैकी एकनाथ शिंदे यांनी १८ जागांची मागणी केली होती, तर अजित पवारांनी ९ जागा मागितल्या होत्या. मात्र भाजपने शिंदेंना ९ आणि अजित पवारांना फक्त ४ जागा दिल्या आहेत. तुम्हाला जर आम्ही जास्त जागा दिल्यास त्या जागा गमावण्याचा धोका आहे असं भाजपने अजित पवार आणि एकनाथ शिंदेंना सांगितलं. त्यामुळे जर तुम्हाला नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी निवडून आलेले पाहायचे असेल तर जास्ती जागांचा हट्ट सोडा असं अमित शहांनी दोन्ही नेत्यांना सांगितलं.

अडीच तास बैठक होऊन सुद्धा एकही जागा वाढवून देण्यास भाजपने तयारी दाखवली नाही. शिंदे आणि अजित पवारांनी वाटाघाटींसाठी बरेच प्रयत्न केले. पण त्यांच्या पदरात अधिकची एकही जागा पडली नाही. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी अमित शहा यांना वेगळाच प्रस्ताव दिला. काही जागांवर आम्ही आमच्या पक्षातून सक्षम उमेदवार देतो. त्यांना कमळ चिन्हावर लढू द्या. त्यामुळे आपल्यातील एकता टिकून राहील,’ असा प्रस्ताव अमित शहांना एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी दिला, त्यावर विचार करू असं आश्वासन अमित शाह यांनी दिल्याची चर्चा आहे.