व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

उद्धव ठाकरेंनीच भाजपला धोका दिला; अमित शहांचा घणाघात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या मुंबई दौऱ्यात शिवसेनेवर जोरदार घणाघात केला आहे. उद्धव ठाकरेंनीच भाजपला धोका दिला . २ जागांसाठी शिवसेनेने २०१४ ला युती तोडली असं म्हणत त्यांनी निशाणा साधला. मुंबईत भाजपच्या पदाधिकारी आणि नेत्यांसोबतच्या बैठकीत त्यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं.

अमित शाह म्हणाले, उद्धव ठाकरेंनी आपल्याला धोका दिला आहे. राजकारणात सगळं काही सहन करा परंतु धोका सहन करू नका. जे धोका देतात त्यांना योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे. धोका देणारा कधीच मजबूत होत नाही. मी कधीच शिवसेनेला मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला नव्हता. असेही त्यांनी म्हणल.

भाजपने कधीच छोटा भाऊ मोठा भाऊ केलं नाही पण शिवसेनेने मात्र फक्त २ जागांसाठी युती तोडली असं अमित शाह म्हणाले. मुंबईच्या राजकारणात फक्त भाजपचे वर्चस्व हवं, त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने रस्त्यावर उतरलं पाहिजे असं आवाहन अमित शहांनी नेत्यांना केलं. अमित शाह यांच्या आक्रमक भाषणानंतर शिवसेना आणि भाजपमधील वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. शहा यांच्या टिकवर शिवसेनेचे नेते कस प्रत्युत्तर देतात हे आता पाहायला हवं