महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादात अमित शाह मध्यस्थी करणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र – कर्नाटक सीमावादात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मध्यस्थी करणार असून १४ डिसेंबर ला ते दोन्ही राज्यातील मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी दिली आहे. आज महाविकास आघाडीच्या खासदारांनी अमित शहांची दिल्लीत भेट घेऊन सीमावादावर चर्चा केली. त्यानंतर अमोल कोल्हे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबत माहिती दिली .

अमोल कोल्हे म्हणाले, महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नावरून मराठी माणसाची जी गळचेपी होतेय त्याबाबत आज अमित शहांशी सर्व खासदारांनी चर्चा केली. अमित शहा यांनी अत्यंत संवेदनशीलतेनं महाविकास आघाडीच्या सर्व खासदारांचे म्हणणं ऐकून घेतले. यासंदर्भात ते स्वतः १४ तारखेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून परस्पर समन्वयातून मार्ग काढला जाईल असं आश्वासन दिले आहे.

दरम्यान, महाराष्ट्र – कर्नाटक सीमावादावरून गेल्या काही दिवसांपासून वातावरण तापलं आहे. महाराष्ट्र्रातील अनेक गाड्यांवर कर्नाटक हल्ला कऱण्यात आल्याने परिस्थिती आणखी चिघळली. या वादावर केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा अशीही मागणी होत आहे. मात्र महाराष्ट्राला १ इंचही जागा देणार असं म्हणत कर्नाटचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई सातत्याने महाराष्ट्राला डिवचत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर अमित शहांची मध्यस्थी हा वाद मिटवण्यात यशस्वी ठरणार का ? हे आता पाहावं लागेल.