अमित शहांनी घेतल लालबागच्या राजाच दर्शन!! बाप्पाकडे काय घातल साकडं?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मुंबईतील मानाचा गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लालबागच्या राजाचे दर्शन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले आहे. गणेशोत्सव सुरू झाल्यापासून अमित शहा लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी मुंबईत येतील ही चर्चा रंगली होती. अखेर आज अमित शहा यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन त्याची पुजा केली आहे. अमित शहा हे लालबाग राजाच्या मंडळात दाखल होण्यापूर्वीच परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच, त्यांच्या सुरक्षितेची पूर्ण काळजी घेण्यात आली होती.

आज दुपारी गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले आहे. यानंतर आता अमित शहा मुंबई विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी निघाले आहेत. हा कार्यक्रम पार पडल्यानंतर संध्याकाळी ठीक सात वाजता अमित शहा दिल्लीसाठी रवाना होते. अशा तऱ्हेने आजचा अमित शहा यांचा मुंबई दौरा पार पडणार आहे.

दरम्यान, मुंबईत दाखल झाल्यानंतर सर्वात प्रथम अमित शहा यांनी लालबाग राजाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे सहकुटुंब आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यापूर्वी गेल्या वर्षी पहिल्यांदा अमित शहा हे लालबाग राजाचे दर्शन घेण्यासाठी मुंबईत आले होते. तेव्हा देखील ही सर्व मंडळी अमित शहा यांच्यासोबत होती.