अतुल भोसलेंना एकदा आमदार तर करा मी त्यांना महाराष्ट्राचा नेता बनवेल – अमित शहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । ‘अतुल भोसले ना एकदा आमदार करा मी त्यांना महाराष्ट्राचा नेता बनवेल ‘ असे ठोस आश्वासन केंद्रीय गृहमंत्री तसेच भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी कराड येथे दिले. सातारा लोकसभा पोटनिवडणुक आणि कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या जाहीर प्रचार सभेत शहा बोलत होते. यावेळी दोन्ही मतदारसंघांचे उमेदवार उदयनराजे आणि अतुल भोसले यांना प्रचंड मतांनी निवडून देण्याची अमित शहा यांनी उपस्थित लोकांना विनंती केली.

कराड येथील प्रचार सभेत बोलत असताना अमित शहा यांनी भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे असे सांगून माझ्या राजकीय प्रवासाची सुरवात सुद्धा बूथ अध्यक्ष म्हणून झाली असल्याचे सांगून भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे. काँग्रेस राष्ट्रवादी ने केलेल्या भ्रष्टाचाराच्या बाबत बोलत असताना अमित शहा यांनी शरद पवार यांना आव्हान देऊन आमच्या मुख्यमंत्री,पंतप्रधान यांच्यावर तुम्ही एक पण आरोप करू शकत नाही असे त्यांनी सांगितले.

उदयनराजेंच्या बाबत बोलत असताना ७० वर्षात कलम ३७० ला हात लावायची कुणाची हिम्मत नव्हती ते मोदींनी करून दाखवलं त्यामुळेच उदयनराजेंनी राष्ट्रवादी सोडून भाजप मध्ये प्रवेश केल्याचे बोलून दाखवले. तसेच उदयनराजेंनी या वेळी बोलताना कलम ३७० मोदींनी आणि भाजपने हटवल्या बाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे कौतुक केले. सोबतच कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातील उमेदवार अतुल भोसले यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर आपल्या भाषणातून टीका केली.