भाजप नेत्याच्या कार्यक्रमाचे अमोल कोल्हेंच्या हस्ते उद्घाटन; दानवेंसोबत केली अर्धा तास चर्चा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेक दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे पक्षातील अंतर्गत वादामुळे नाराज असून ते भाजपमध्ये जाणार अशी चर्चा केली जात आहे. अशात कोल्हे यांनी आता थेट भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे यांच्या मुलाच्या फर्मचे उद्घाटन केले. इतकेच नाही तर त्यांनी केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी सुमारे अर्धा तास गाडीत चर्चा केली असल्याने अनेक प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

केंद्रीयमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचे बंधू भास्कर दानवे हे जालना जिल्ह्याचे भाजप उपाध्यक्ष आहेत. दरम्यान, खासदार अमोल कोल्हे यांनी आज जालन्यात जाऊन मंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. तसेच त्यांनी प्रतीक दानवे यांच्या ‘करेज’ फर्मचे उद्घाटन केले. भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षांच्या फर्मचं उद्घाटन राष्ट्रवादीचे खासदार कोल्हे यांनी केल्याने पुन्हा त्यांच्या पक्षातराच्या चर्चांना उधाण आले आहे.

यावेळी रावसाहेब दानवे आणि अमोल कोल्हे यांच्यात काही विषयांवर सुमारे 30 ते 40 मिनिटे चर्चाही झाली आहे. यापूर्वीही अमोल कोल्हे यांनी रावसाहेब दानवे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. अमोल कोल्हे यांनी आपल्या चित्रपटाचे पोस्टर देखील अमित शहांच्या हस्ते प्रकाशित केले होते. तेव्हापासूनच ते भाजपमध्ये जाणार अशा चर्चांना उधाण आले आहे.