प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावर अमोल कोल्हेंनी घातला दंडवत; केला ‘तो’ व्हिडीओ ट्विट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला असे वादग्रस्त विधान भाजप आमदार प्रसाद लाड यांनी नुकतेच केले. त्यांच्या या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार, अभिनेते अमोल कोल्हे यांनी लाड यांचे विधान ऐकताच त्यांनी एक व्हिडीओ ट्विट करत थेट हात जोडून दंडवत घालत प्रतिक्रिया दिली आहे. “काय ते अगाध ज्ञान…अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे की, अपुऱ्या किंवा चुकीच्या माहितीच्या आधारे इतिहासाचे दाखले देण्यास एकतर मनाई करावी किंवा अशा व्यक्तींना इयत्ता चौथी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकडून विशेष प्रशिक्षण देण्यात यावे, असे कोल्हे यांनी म्हटलं आहे.

यापूर्वीच छत्रपती शिजवी महाराज यांच्याबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजप मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी वादग्रस्त विधान केले आहे. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. अशात भाजप नेते प्रसाद लाड यांनी केलेल्या वक्तव्यानंतर भाजपची डोकेदुखी वाढणार हे नक्की?

प्रसाद लाड यांनी मागितली माफी?

छत्रपती शिवराय हे संपूर्ण विश्वाचे आराध्य दैवत आहेत. महाराजांची कर्मभूमी कोकण होती, स्वराज्याची मुहूर्तमेढ कोकणात रोवली गेली हे देखील विसरून चालणार नाही. अनावधानाने माझ्याकडून दुसरा शब्द प्रयोग झाला. परंतू, त्वरित चूक दुरुस्त केल्याचे प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे. विश्वाचे आराध्य दैवत शिवरायांचा सन्मान आम्ही यापुढेही ठेवणार. कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, असे प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे.