Tuesday, June 6, 2023

“भगतसिंग कोश्यारी भाजपवाल्यांचा जावई लागतो का?”; ‘या’ नेत्याची भाजपवर घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याच्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज याच्याबद्दल एक विधान व्यक्त केले. पवारांच्या या विधानावरून भाजपने आक्रमक पावित्रा घेत आंदोलन पुकारले आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपवर घणाघाती टीका केली आहे. “ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी बेताल वक्तव्य केले होते. त्यावेळी यांचा सन्मान कुठे गेला होता. कोश्यारी भाजपवाल्यांचा जावई आहे का? त्यावेळी का आंदोलन केले नाही, असा सवाल मिटकरी यांनी केला आहे.

अमोल मिटकरी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “चंद्रशेखर बावनकुळे यांनी छत्रपती संभाजी महाराज यांना किती भाषा येत होत्या आणि त्या भाषा त्यांनी जाहीर सांगावे. आता अजित पवार यांनी जे विधान केले आहे त्यावरून भाजप आक्रमक होत आहे तर मग भगतसिंग कोश्यारी, मंगलप्रभात लोढा, चंद्रकांत पाटील यांनी ज्या वेळ बेताल वक्तव्य केली होती. त्यावेळी गप्प का बसला होता.

या राज्यात आणि केंद्रात खरं तर तुघलकी सरकार असून हे औरंगजेब विचारांचे सरकार आहे. अजित पवार बोलले म्हणून त्यांच्यावर टीका करताना चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठ मोठ्या वल्गना करू नये. त्यांनी आधी छत्रपती संभाजी महाराज यांना किती भाषा अवगत होत्या, असा सवाल मिटकरी यांनी केला.