व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

पंकजाताई, भाजप पंख छाटते, खडसेंप्रमाणे तुम्हीही राष्ट्रवादीत या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे यांच्या पुण्याईने भाजप पक्ष वाढला. मात्र सुडाचं राजकारण करून त्यांच्याच मुलीचा पराभव करण्यात आला. पक्ष वाढवणाऱ्यांचे पंख कसे छाटले जात आहे . रोहिणी खडसेंच्या ते लक्षात आलं, आणि त्या राष्ट्रवादीत आल्या. तशाच पद्धतीने पंकजा मुंडेंनीही पाऊल उचलावं, अशी थेट ऑफर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी पंकजा मुंडे यांना दिली आहे. जळगाव येथील रोहिणी खडसे यांच्या संवाद यात्रेवेळी ते बोलत होते.

अमोल मिटकरी म्हणाले, राज्यपाल १२ आमदारांची यादी लवकरच मान्य करतील. पण त्या यादीत दुर्दैवाने पंकजा मुंडेंचं नाव नाही. म्हणजेच, आपल्या पक्षाला प्रामाणिकपणे वाढवणाऱ्या लोकांचे पक्ष छाटले जातात. रोहिणी खडसेंना पुढचं भविष्य दिसलं आणि त्या लगेच राष्ट्रवादीत आल्या, आता पंकजा मुंडेंनाही याची जाणीव असेल. तुमच्या पक्षात तुम्हाला अप्रत्यक्षपणे बाजूला ठेवत आहे, हे ओळखणं गरजेचं आहे, आणि पुढचं पाऊल उचलावे असं म्हणत मिटकरींनी पंकजा ताईंना ऑफर दिली आहे.

यावेळी, त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही डिवचले. फडणवीस हे मुख्यमंत्री होतील असं वाटलं होत पण त्यांना दिल्लीतून आदेश आला कि चुपचाप उपमुख्यमंत्री बनो.. उपसरपंचाचा सरपंच होणे हे प्रमोशन असतं. सरपंचाचा उपसरपंच होणार हे डिमोशन असतं. मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्री व्हावे लागले. ही महाराष्ट्रातल्या इतिहासातील पहिली घटना आहे, असा टोला मिटकरींनी फडणवीसांना लगावला.