भाजप आमदाराच्या आग्र्याच्या सुटकेच्या विधानावरून मिटकरी आक्रमक; म्हणाले की,

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत किल्ले प्रतापगड येथे 363 वा शिवप्रताप दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी एकनाथ शिंदेंच्या बंडाची तुलना थेट शिवरायांच्या आग्रातील सुटकेशी केली. यावरून आता लोंढा यांच्यावर टीका होऊ लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी लोढा यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागले आहे. मंगलप्रभात लोढा यांचे हे दुर्दैवी वक्तव्य आहे. त्यांच्याकडे पर्यटन खाते असले तरी एवढी त्यांची बुद्धीमत्ता नाही, अशी टीका मिटकरी यांनी केली आहे.

प्रतापगडावर पार पडलेल्या कार्यक्रमात मंत्री लोंढा यांनी केलेल्या तुलनात्मक वक्तव्यानंतर आमदार अमोल मिटकरी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मंगलप्रभात लोढा आणि शिवाजी महाराजाच्या इतिहासाचा काही संबंध असेल असे मला वाटत नाही, त्यांचा तितका अभ्यासही असेल असे मला वाटते. शिवाजी महाराजांनी गद्दारी केली नव्हती, ते स्वराज्य वाचविण्यासाठी महाराजांचे नियोजन कौशल्य होते. राज्यपालांनी ज्या पद्धतीने शिवरायाचा अपमान केला तसेच हे वक्तव्य आहे, यांचा आम्ही निषेध व्यक्त करतो.

मंगलप्रभात लोढा नेमकं काय म्हणाले?

प्रतापगडावरील कार्यक्रमप्रसंगी भाजप नेते आणि राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज एक भाषण केले. यावेळी त्यांनी ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्ऱ्यातून सुटका करून घेतली त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही बाहेर पडले, असं म्हणत एकनाथ शिंदेंच्या बंडाची तुलना थेट शिवरायांच्या आग्रातील सुटकेशी केली आहे.