“बॅनरवर पांडुरंग अन् मटणावर ताव” KCR वादाच्या भोवऱ्यात सापडणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrasekhar Rao) पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी महाराष्ट्र्रात दाखल झाले आहेत. आपल्या संपूर्ण मंत्रिमंडळासोबत तब्बल 600 ताफ्यांच्या गाडीसह KCR महाराष्ट्रात आले आहेत. उद्या ते पंढरपुरात येणार असून त्याआधीच उमरगा येथे केसीआर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मटणावर ताव मारला आहे. खरं तर पंढरीची वारी करत असताना नॉनव्हेज खाऊ नये असं मानलं जात, परंतु केसीआर यांनी वारीच्या आदल्या दिवशीच मटणावर ताव मारल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी या सर्व प्रकारानंतर चंद्रशेखर राव यांच्यावर सडकून टीका केली आहे. महाराष्ट्रात तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचे आगमन होण्यापुर्वी पैशाच्या जोरावर ठिकठिकाणी मटणाचे बेत आखल्या जात आहेत. बॅनर वर पांडुरंगाचे फोटो तर मटणावर ताव हाणून पंढरीत आगमन ? के. चंद्रशेखर राव पंढरीची वारी पवित्र आहे ती अपवित्र करू नका असं ट्विट करत अमोल मिटकरी यांनी केसीआर यांच्यावर निशाणा साधला आहे.

दरम्यान, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन के. चंद्रशेखर राव यांच्या BRS ने महाराष्ट्र्रात पाय रोवायला सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून पंढरीच्या आषाडी एकादशीचे निमित्त साधून ते पांडुरंगाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रात आले आहेत. तब्बल ६०० गाड्यांचा ताफा घेऊन केसीआर हे सोलापुरात दाखल झालेले आहेत. उद्या ते विठुरायाचे दर्शन घेतील. त्यानंतर ते तुळजापूरला जाऊन तुळजाभवानी देवीचं दर्शन घेतील. त्यातच उद्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भागीरथ भालके केसीआर यांच्या तेलंगण राष्ट्र समिती मध्ये प्रवेश करणार आहेत . केसीआर यांच्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीला फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.