देशातील ‘टॉप 20’ कुलगुरुंमध्ये डॉ. प्रमोद येवले यांची निवड

0
30
Pramod yeole
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांची देशातील ‘टॉप 20 कुलगुरुंमधे निवड झाली आहे. विशेष म्हणजे या यादीत महाराष्ट्रातून केवळ डॉ. प्रमोद येवले यांचाच समावेश आहे. युलेकेज् वॉल ऑफ फेम‘ या आंरतराष्ट्रीय संस्थेच्यावतीने ‘टॉप २० एमिनंट व्हाईस चान्सलर्स ऑफ इंडिया‘ अर्थात भारतातील उत्कृष्ट २० कुलगुरुंची यादी‘ घोषित करण्यात आली आहे. देशातील शंभरहून अधिक विद्यापीठांच्या कुलगुरुंचे नामांकन यात करण्यात आले

या संस्थेने नेमलेल्या ज्यूरींनी यातून 20 कुलगुरुंची निवड केली. विद्यापीठाची शैक्षणिक गुणवत्ता तसेच उत्तम प्रशासन तसेच दर्जेदार संशोधन आदी बाबींवरून सदर निवड करण्यात आली. तसेच संबंधित कुलगुरुंनी विद्यापीठाच्या प्रगतीसाठी केलेल्या प्रयत्नाची दखल या संस्थेने घेतली. डॉ. प्रमोद येवले यांनी गेल्या दोन वर्षांत पेट, ऑनलाईन परीक्षा, दोन कोविड टेस्टिंग लॅब यासह अनेक प्रकल्प यशस्वी केले आहेत. तसेच दोन पेटंटही या काळात त्यांना प्राप्त झाले आहेत.

दरम्यान, या निवडीबद्दल कुलगुरू डॉ प्रमोद येवले यांचे प्र-कुलगुरू डॉ शाम शिरसाट, डॉ.जयश्री सूर्यवंशी, अधिष्ठाता, विविथ अधिकार मंडळाचे सदस्य कर्मचारी संघटनेचे नेते डॉ कैलास पाथ्रीकर, प्रकाश आकडे, अनिल खामगावकर यांच्यासह अधिकारी-कर्मचारी यांनीभेट घेऊन सत्कार केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here