हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| संपूर्ण जगभरामध्ये AI चे वाहत असताना वनइंडियाने (OneIndia) स्पार्क ओरिजिनल्स (Spark Originals) यासारख्या अत्याधुनिक एआय-संचालित व्हिडिओ प्रोडक्शन स्टुडिओची घोषणा केली आहे. या स्टुडिओच्या माध्यमातून जाहिरातदार, चित्रपट निर्माते आणि निर्मात्यांना उच्च-गुणवत्तेची, सर्जनशील आणि तांत्रिकदृष्ट्या समृद्ध सुविधा मिळणार आहेत.
एआयच्या मदतीने नाविन्यपूर्ण निर्मिती
सांगायचे म्हणजे, स्पार्क ओरिजिनल्स प्रगत एआय आणि संपादन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने दर्जेदार व्हिडिओ तयार करते. मानवी सर्जनशीलतेला एआयसोबत एकत्र करून डायनॅमिक अॅनिमेशन, स्केच-शैलीतील व्हिज्युअल आणि वातावरण निर्मिती करणारी व्हिडिओ सामग्री यात विकसित केली जाते. तसेच, मोशन कॅप्चर आणि कंपोझिटिंग तंत्रांचा वापर करून उत्पादन प्रक्रियेत गती आणि अचूकता आणली जाते.
B2B आणि B2C क्षेत्रावर लक्ष
मिळालेल्या माहितीनुसार, हा प्लॅटफॉर्म B2B आणि B2C दोन्ही प्रकारच्या ग्राहकांसाठी उपयुक्त आहे. B2B क्षेत्रात चित्रपट निर्माते, जाहिरातदार आणि डिजिटल कंटेंट निर्माते यांना पूर्ण प्री-प्रोडक्शन सपोर्टसह AI-संचालित स्टोरीटेलिंगची सुविधा मिळते. यासह फीचर फिल्म, टीझर्स आणि मार्केटिंगसाठी आवश्यक प्रोटोटाइप यांची निर्मिती करण्यास हा स्टुडिओ ठरतो.
तसेच, B2C विभागामध्ये YouTube, Instagram यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी वैविध्यपूर्ण कंटेंट तयार केला जातो. प्रेक्षकांना माहितीपट, प्रेरणादायी आणि मनोरंजन आधारित स्टोरीज देण्याच्या उद्देशाने व्हिडिओ तयार केले जातात. तसेच, स्थानिक गुन्हेगारी, ऐतिहासिक घटना, वैज्ञानिक शोध आणि पर्यावरणीय विषयांवर व्हिडिओ यामध्ये बनवले जातात.
खास म्हणजे, स्पार्क ओरिजिनल्स हिंदी, मराठी, तमिळ, तेलगू, बंगाली, गुजराती यांसारख्या प्रादेशिक भाषांसह इंग्रजी, अरबी, स्पॅनिश आणि फ्रेंचमध्येही कंटेंट तयार करतो. त्यामुळे लोकांना स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांपर्यंत सहजपणे पोहोचता येते.
दरम्यान, स्पार्क ओरिजिनल्स हे एक बहुपयोगी प्लॅटफॉर्म आहे. त्यामुळे चित्रपट निर्माते, ब्रँड्स आणि कंटेंट क्रिएटर्स यांना त्यांच्या कल्पनांना अधिक प्रभावी स्वरूप देण्यासाठी या स्टुडिओची मदत होणार आहे. तुम्हाला याबाबत अधिक माहिती हवी असल्यास Spark Originals च्या अधिकृत [YouTube] चॅनेलला भेट द्यावी किंवा spark@one.in वर संपर्क साधावा.