औरंगाबाद | कोरोना महामारीमुळे संपूर्ण राज्यभर लॉकडाऊन लावण्यात आले होते. मात्र सर्व निर्बंध रूग्णसंख्या घटल्याने शिथिल करण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वी पर्यटन स्थळे सुरु झाली आहेत. यामुळे पर्यटणासाठी आलेल्या नागरिकांसोबतच विक्रेत्यांच्या चेहेऱ्यावरचा आनंद पाहायला मिळत आहे.
ऐतिहासिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबाद या शहरातील पाणचक्की, बीबीका मकबरा, दौलताबाद, वेरूळ-अजिंठा लेणी यासह सर्व पर्यटनस्थळे हे सुरु करण्यात आले आहे. या ठिकाणी असलेल्या व्यापाऱ्यांचे पोटही पर्यटकांवर आधारित आहे. छोटे-मोठे व्यापारी व्यवसायिक यांच्या कमाईची साधन ही पर्यटनस्थळांवर आधारित आहेत. कोरोना महामारीमुळे पर्यटनस्थळे बंद ठेवण्यात आले होते. यावेळी विक्रेते आणि व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ निर्माण झाली होती.
‘बाहेरील पर्यटकांसाठी नाही तर लोकल पर्यटकांसाठी ठराविक वेळेसाठी पर्यटन स्थळे सुरू करण्यात यावी’ अशी विनंती पर्यटनस्थळी असलेल्या दुकानदारांनी केली होती. यातच आता नियमाचे पालन करून पर्यटनस्थळ सुरु करण्यात आले आहे. यामुळे पर्यटकांसोबतच विक्रेत्यांच्या चेहेऱ्यावर सुद्धा आनंद पाहायला मिळत आहे. पर्यटनस्थळे सुरू झाल्याने नागरीकांना देखील दिलासा मिळालेला आहे. लॉकडाऊन मध्ये सगळा वेळ घरात गेल्याने नागरीक बाहेर येऊन मोकळा श्वास घेत आहेत.