पुणे शहरात भरदिवसा गोळीबार! कुख्यात गुंड शरद मोहोळ याला जिवे मारण्याचा प्रयत्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पुणे शहरात आज भरदिवसा गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला आहे. या घटनेमध्ये शरद मोहोळवर याला तीन गोळ्या लागल्या आहेत. त्यामुळे त्याला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही आज दुपारी कोथरूडमधील सुतारदरा परिसरात घडली आहे. मात्र अद्याप हा गोळीबार कोणी केला आणि कोणत्या कारणासाठी केला हे स्पष्ट झालेले नाही.

समोर आलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी कोथरूड मधील सुतारदरा परिसरात शरद मोहोळ याच्यावर अज्ञात हल्लोखोरांनी येऊन गोळीबार केला. या हल्लेखोरांनी लागोपाठ तीन गोळ्या शरद मोहोळ याच्यावर झाडल्या. यानंतर हल्लेखोर तेथून पळून गेले. या घटनेनंतर शरद मोहोळ याला तातडीने रुग्णालयात उपचारसाठी दाखल करण्यात आले. या गोळीबाराची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. सध्या घडलेल्या घटनेचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. परंतु गॅंगवॉर प्रकरणातून हा गोळीबार झाल्याची शक्यता वर्तवली जाते.

शरद मोहोळ कोण आहे?

पुण्यातील कुख्यात गुंड म्हणून शरद मोहोळ याची ओळख आहे. हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण असे अनेक गुन्हे शरद मोहाळे याच्यावर दाखल करण्यात आले आहेत. शरद मोहोळ आणि त्याच्यासाठीदारांनी मिळून पिंटू मारणे याचा खून खून केला होता. या प्रकरणात शरद मोहोळ याला अटक करण्यात आली होती. परंतु कोणतेही पुरावे न आढळल्यामुळे पुन्हा त्याची सुटका करण्यात आली.