कराडच्या पाणी प्रश्नासाठी तीव्र जन आंदोलन उभारणार : ऋतुराज मोरे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी
कराड शहरासाठी उपयुक्त असणारी 24 तास पाणी पुरवठा योजना गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे, पूर्णतः कार्यान्वित झालेली नाही. तसेच काही महिन्यापासून 24 तास पाणी योजना सुरु असल्याचे सांगून प्रत्यक्षात शहराला पूर्वी सारखाच 2 वेळा पाणी पुरवठा केला जात आहे. तरीही वार्षिक बिल न आकारता 24 तास पाणी योजनेचे बिल आकारले जात आहे. शहरातील नागरिकांवर ही अन्यायकारक बाब असल्याने कराड शहर काँग्रेस कमिटीने या महत्वाच्या पाणी प्रश्नावर मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन इशारा दिला आहे. चोवीस तास पाणी योजनेची अनियमितता तात्काळ दुरुस्त करावी. अन्यथा तीव्र जनआंदोलन उभारले जाईल, असा इशारा कराड शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ऋतुराज मोरे यांनी दिला.

आज त्यांनी काँग्रेस पक्षातर्फे एक निवेदन मुख्याधिकारी रमाकांत डाके उपस्थित नसल्याने उपमुख्याधिकारी विशाखा पवार यांना देण्यात आले. यावेळी कराड शहर काँग्रेस अध्यक्ष ऋतुराज मोरे, सातारा जिल्हाध्यक्ष अल्पसंख्याक विभाग झाकीर पठाण, नगरसेवक फारुक पटवेकर, माजी नगरसेवक अशोक पाटील, प्रदीप जाधव, नगरसेवक इंद्रजित गुजर, माजी शहराध्यक्ष व नगरसेवक राजेंद्र माने, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पाटील, संजय चव्हाण, आमीर कटापुरे, मुसा सुतार, मुक्तारभाई बागवान,आलिज मुतवल्ली, श्रींकांत मुळे, निलेश चौगुले, अशोक सूर्यवंशी, योगेश लादे, विश्वजित दसवंत, जयवर्धन देशमुख, मुबिन बागवान, इरफान सय्यद, विक्रम जाधव, शरीफ मोमीन, नईम पठाण,अमोल नलवडे, विक्रांत पाटील, मतीन मुतवल्ली, अजीम मुजावर, अर्जुन पुजारी, ऋषिकेश कांबळे, रोहित पवार, रमजान कागदी, सलीम बागवान, अमिरहुसेन कटापुरे, शरीफ मुल्ला, पंढरीनाथ खबाले, हणमंत शिंदे, जावेद पठाण, गणेश गायकवाड, महेश कांबळे, सुरेश पाटील, रफिक मुलाणी, ललित राजापुरे, सुजित जाधव, अबरार मुजावर, सागर पाटील, सिद्धार्थ थोरवडे, विनायक मोहिते, अतुल बारटक्के, संभा पवार आदी उपस्थित होते.

कराड शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ऋतुराज मोरे म्हणाले, कराड शहराची 24 बाय 7 पाणी पुरवठा योजना म्हणजे मोठे गौडबंगाल आहे. गेली कित्येक वर्षे कराड शहराला रोज 24 तास पाणी पुरवठा चालू होईल, म्हणून कराडकर नागरिक वाट पाहत आहेत. परंतु कराड नगरपालिकेच्या ढिसाळ व अनागोंदी कारभारामुळे आजतागायत कराडकर नागरिकांना रोजचा 24 तास पाणी पुरवठा होऊ शकलेला नाही. कराड नगरपालिका प्रशासनाने 1 एप्रिल 2022 पासून 24 बाय 7 पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करून मीटर प्रमाणे आकारणी चालू केली. परंतु प्रत्यक्षात शहरात रोज दोनदा च पाणीपुरवठा केला जात आहे व आकारली जाणारी बिले हि कराडकरांना न परवडणारी आहेत. तसेच पाणी पुरवठा सुरु होण्याच्या आधी व नंतर हवेच्या प्रेशर ने मीटर फिरते असे निदर्शनास येते व त्याची सुद्धा आकारणी कराडकरांकडून केली जात आहे हे अत्यंत अन्यायकारक आहे. अशा अनागोंदी कारभारामध्ये तात्काळ सुधारणा व्हावी तसेच जोपर्यंत 24 तास पाणीपुरवठा योजना पूर्णपणे कार्यान्वित होत नाही तोपर्यंत पूर्वीप्रमाणेच वार्षिक बिल आकारणी व्हावी अन्यथा तीव्र जनआंदोलन उभारले जाईल.