परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे
परभणी जिल्ह्यातील धार्मिक स्थळी दर्शनासाठी आलेल्या पुणे येथील तरुण चार्टर्ड अकाउंटंटचा गोदावरी नदीमध्ये पोहण्यासाठी गेल्यानंतर पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी दुपारी घडली आहे. परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यामध्ये गोदावरी नदीकाठी गुंज गाव असून येथे महाविष्णू चे मंदिर आहे. प्रतिवर्षी याठिकाणी धार्मिक महोत्सवाचे आयोजन केले जाते. या महोत्सवात हजेरी लावण्यासाठी व धार्मिक दर्शनासाठी राज्य व परराज्यातील भाविक मोठ्या संख्येने येत असतात. यावर्षीही गुरुवारी संध्याकाळी हा महोत्सव संपला.
महोत्सव, महाशिवरात्रि निमित्त गूंज देवस्थानाला गोविंद रामप्रसाद शर्मा आले होते. शुक्रवार दि .२१ रोजी दुपारी बारा वाजता गोविंद शर्मा नदीपात्रात उतरले होते. याठिकाणी गोदावरी पात्रात असणाऱ्या पाण्याच्या खोलीचा त्यांना अंदाज बांधता आला नाही व मदत मिळण्यापूर्वीच त्यांचा बुडून मृत्यू झाला. घटनेनंतर मृतदेह पाथरी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी भाविकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.
an-unfortunate-death-of-a-chartered-accountant-in-the-river-godavari