साताऱ्याप्रमाणे कराडातही मोक्काची कारवाई करा !

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
सातारा जिल्हा पोलिसांनी आज साताऱ्यातील मटका चालकावर मोक्का कारवाई केली. परंतु कराड शहरातील अशा पद्धतीचे मटका व्यवसायिकांचे उच्छाद वाढला आहे. तेव्हा त्याच्यावर कधी कारवाई होणार? त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी कराड शहरातील अवैध व्यावसायिकांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते आनंदराव लादे यांनी केली आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहरातील मटकाकिंग समीर कच्छीसह त्याच्या टोळीविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आले. याबाबत कराडचे माजी नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते आनंदराव लादे यांनी माध्यमांशी संवाद साधत प्रतिक्रिया दिली.

यावेळी लादे म्हणाले की, सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी मोक्काची जी कारवाई केली आहे. ती खरोखरच समाधानकारक अशी आहे. विविध संघटना बेकादेशीरपणे सुरु असलेल्या व्यवसायासंदर्भात कारवाई करावी, या संदर्भात वारंवार पत्रव्यव्हार करतात. त्यांची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी कारवाई केली. आज ज्या पद्धतीने सातारा येथे कारवाई करण्यात आली त्या पद्धतीने कराड येथे कारवाई करावी, अशा कराड शहरातील खूप नागरिकांच्या भावना आहेत.

भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आम्ही देखील खूप पत्रव्यवहार केलेले आहेत. परंतु आजच्या कारवाईनंतर आम्हाला एक अपेक्षा आहे कि जिल्हा पोलीस अधीक्षक एक चांगल्या पद्धतीने कराड शहरात कारवाई करतील. कराड शहरात मटका व्यावसायिकांचे प्रमाण वाढत आहे. गांजासारखे पदार्थही असल्याने तरून व्यसनाच्या आहारी जात आहेत. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी कराड शहरात कारवाई करवाई, अशी मागणी लादे यांनी केली आहे.