लालबागच्या राजाचा रुबाबच न्यारा ! अनंत अंबानींकडून 20 किलो सोन्याचा मुकुट अर्पण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

देशातल्या गर्भश्रीमंत व्यक्तींच्या मध्ये अंबानी कुटुंबाचं नाव आवर्जून घेतलं जातं. मागच्या काही दिवसांपासून अनंत आणि राधिका अंबानी यांच्या लग्नाची चर्चा मोठ्या प्रमाणात देशामध्ये रंगली होती आता पुन्हा एकदा ही नावं एका नव्या गोष्टीमुळे चर्चेत आली आहेत. सद्या देशभरात गणेश उत्सवाची धामधूम पाहायला मिळते आहे. मुंबईतील सर्वात लोकप्रिय गणपती म्हणजे ‘ लालबागचा राजा ‘… 21 फुटी गणपती असलेल्या या लालबागच्या राजाला बघ्यांची खूप मोठी गर्दी होते.

यंदाच्या वर्षीची मूर्ती कशी असणार ? इथे पासून ते अगदी आरास आणि सजावट काय असणार इथपर्यंत लोकांची उत्सुकता ताणली गेलेली असते. मात्र लालबागच्या राजाला यंदाच्या वर्षी सोन्याचा मुकुट अर्पण केला गेला आहे. विशेष म्हणजे हा मुकुट अनंत अंबानी यांच्याकडून अर्पण केला गेला आहे.

अनंत आणि राधिका यांचा लग्नानंतरचा हा पहिलाच गणेशोत्सव असणार आहे. लालबागच्या मंडळाचं हे 91 वे वर्ष आहे. यंदाच्या वर्षी लालबागच्या राजाला आनंद अंबानी यांच्याकडून सोन्याचा मुकुट अर्पण करण्यात आला आहे. हा मुकुट २० किलो सोन्याचा आहे.

यावर्षीचा लालबागचा राजा कसा असणार आहे ? याच्याबद्दल बोलायचं झाल्यास लालबागच्या राजाची मूर्ती यंदाच्या वर्षी मयूरासनावर विराजमान झालेली आहे. नवसाला पावणारा लालबागचा राजा अशी लालबागच्या गणपतीची ख्याती आहे. या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी सेलिब्रिटीस लाखो लोक दरवर्षी गर्दी करतात. त्याचप्रमाणे मुकेश अंबानी यांचीही सहकुटुंब उपस्थिती लालबागच्या राजाच्या दर्शनाला असते. यावर्षी अनंत आणि राधिका यांचा लग्न सोहळा पार पडला यानंतर लालबागचा राजा कार्यकारिणी मंडळाच्या विश्वस्त पदावर अनंत अंबानींची नियुक्ती करण्यात आली. महिनाभरापूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अंबानी कुटुंबाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन हा निर्णय घेण्यात आला. आता अनंत अंबानी यांनी लालबागच्या राजाला २० किलो सोन्याचा मुकुट अर्पण केला आहे.

१५ कोटींचा सोन्याचा मुकुट

यावर्षी लालबागच्या राजाला मरून रंगाचं वेलवेटचं सोवळं नेसवण्यात आले आहे. तर काशी विश्वनाथ मंदिराच्या थीमचा देखावा साकारण्यात आलाय लालबागचा राजा सर्वजनिक गणेशोत्सव मंडळात विश्वस्त पदी नियुक्त झालेल्या अनंत अंबानी यांनी राजाला सोन्याचा मुकुट भेट दिला आहे. या मुकुटाचे वजन हे २० किलो असून त्याची किंमत १५ कोटी रुपये आहे. हा मुकुट बनवण्याकरता कारागिरांना दोन महिने मेहनत करावी लागली होती. अशी माहिती लालबागच्या राजाचे मानव सचिव सुधीर साळवी यांच्याकडून देण्यात आली आहे.