उद्धव ठाकरेंच्या भेटीला अंबानी; तब्बल 3 तास चर्चा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे सुपुत्र अनंत अंबानी यांनी थेट मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. दोघांमध्ये तब्बल 3 तास खलबत झाल्याने चर्चाना उधाण आले आहे. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे मात्र अद्याप समजू शकले नाही.

शुक्रवारी रात्री ८ वाजून २० मिनिटांनी अनंत अंबानी उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल झाले. त्यावेळी आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते. त्यांच्यात तब्बल तीन तास चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, याभेटीमागचे नेमके कारण कळू शकलेले नाही. दिवाळी निमित्तानं सदिच्छा भेट असल्याचं सांगण्यात येत आहे. रात्री 11.30 वाजताच्या सुमारास अंबानी मातोश्रीवरुन बाहेर पडले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुकेश अंबानी यांनी वर्षावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्याच वेळी गौतम अदानी यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. त्यामुळे या भेटीगाठी नेमक्या कशासाठी होत्या याबाबत चर्चा रंगल्या होत्या. आता मुकेश अंबानी यांचे सुपुत्र अनंत अंबानी मातोश्रीवर गेल्याने पुन्हा एकदा चर्चाना उधाण आले आहे.