Anant Ambani Wedding: अंबानी यांच्या लग्नसोहळ्यामुळे मुंबईत 3 दिवस वाहतुकीत बदल ; काय असतील पर्यायी मार्ग ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Anant Ambani Wedding: आज दिनांक 12 जुलै रोजी रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख आणि देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी यांचा विवाह प्रसिद्ध उद्योगपती एन्कोर हेल्थकेअर सीईओ वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट यांच्यासोबत होणार आहे. जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होणाऱ्या भव्य अंबानी विवाह सोहळ्याच्या (Anant Ambani Wedding) पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी 12 ते 15 जुलै दरम्यान ट्रॅफिक ॲडव्हायझरी जारी केली आहे.

मुंबई पोलिसांनी शुक्रवारी जारी केलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, लग्न समारंभात अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी आणि इतर हाय-प्रोफाइल पाहुणे उपस्थित राहणार असल्याने अनंत अंबानींच्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरजवळ वाहतुकीसाठी स्वतंत्र मार्ग ठेवण्यात येईल. त्यामुळे आज दिनांक 12 जुलै दुपारी एक वाजल्यापासून ते 15 जुलै मध्यरात्रीपर्यंत (Anant Ambani Wedding) बीकेसी परिसरात वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. तर येथील मार्गाला पर्यायी मार्ग सुद्धा उपलब्ध करण्यात आले आहेत.

काय असेल वाहतुकीत बदल? (Anant Ambani Wedding)

  • अंबानी चौक ते लक्ष्मी टॉवर जंक्शन पर्यंतचा लतिका रस्ता वाहतुकीसाठी एकेरी करण्यात आलेला आहे.
  • कौटिल्य भवन ते अमेरिकन कन्सुलेट पर्यंत अवेन्यू 3 रोडवर एकेरी वाहतूकीची सुविधाही असेल.
  • भारत नगर, वन बीकेसी वि वर्क्स गोदरेज येथून येणारी वाहतूक जिओ कन्वेंशन सेंटर गेट क्रमांक २3 वर प्रतिबंधित असणार आहे. येथून वाहतूक युएस कॉन्सुलेट,एमटीएनएल जंक्शन कडे जाईल.
  • अमेरिकन दूतावास, जियो वर्ल्ड कन्वेंशन सेंटर, बीकेसी कनेक्टर कडे जाताना एमटीएनएल जंक्शन (Anant Ambani Wedding) कडून येणारी वाहतूक सन टेक बिल्डिंग इथं थांबवण्यात आली आहे.
  • कुर्ला जंक्शन, एमटिएनएल जंक्शन, प्लेटिना जंक्शन,डायमंड जंक्शन येथून धीरूभाई अंबानी चौकातील (Anant Ambani Wedding) बीकेसी कनेक्टर कडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी असणार आहे. या भागात लग्नासाठी आमंत्रित केलेल्या लोकांचीच वाहन इथं प्रवेश करू शकतील.
  • पर्यायी मार्ग म्हणून कुर्ला एमटीएनएल जंक्शन, प्लेटिना जंक्शन, डायमंड जंक्शन इथून येणारे वाहन चालक नाबार्ड जंक्शन येथून डावीकडे वळून डायमंड गेट क्रमांक आठ मधून पुढे जातील.
  • शिवाय पर्याय म्हणून वन बीकेसी कडून येणारी वाहने लक्ष्मी टॉवर जंक्शन, डायमंड गेट क्रमांक आठ, नाबार्ड जंक्शन येथून डावीकडे वळू शकतात. डायमंड जंक्शन पासून उजवीकडे वळून धीरूभाईअंबानी चौकातून बीकेसी कडे जाता येईल.
  • लक्ष्मी टॉवर जंक्शन, धीरूभाई अंबानी स्क्वेअर, अवेन्यू लेन 3 ,इंडियन ऑइल पेट्रोल पंप, डायमंड जंक्शन ,हॉटेल ट्रायडेंट कडून कुर्ला एमटीएनएल कडे जाणाऱ्या वाहतुकीवर बंदी असणार आहे. लग्नासाठी आमंत्रित केलेल्या पाहुण्यांच्या वाहनांनाच इथे परवानगी (Anant Ambani Wedding) असणार आहे.