वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनमध्ये सुवर्ण जिंकणाऱ्या खेळाडूला लाथा बुक्क्यांनी मारहाण, Video आला समोर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राला वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनमध्ये रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते. नीरजचे चॅम्पियन बनण्याचे स्वप्न भंग करणाऱ्या ग्रेनेडाच्या ॲंडरसन पीटर्सला (Anderson Peters) त्याच्याच देशात मारहाण करण्यात आली आहे. पीटर्सवर (Anderson Peters) काही लोकांनी जीवघेणा हल्ला केला आहे, ज्यामध्ये तो जखमी झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी काही लोकांना ताब्यात घेतले आहे. या मारहाणीचा सर्व थरार कॅमेरात कैद झाला असून याची व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

ॲंडरसन पीटर्सने (Anderson Peters)अलीकडेच अमेरिकेत पार पडलेल्या वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भालाफेकमध्ये सुवर्ण पदक जिंकले होते. त्याने तब्बल 90.54 मीटर भाला फेकून हे सुवर्ण पदक आपल्या नावावर केले होते. मात्र ॲंडरसना (Anderson Peters) त्याची ही सुवर्ण कामगिरी राष्ट्रकुल स्पर्धेत कायम ठेवता आली नव्हती. राष्ट्रकुल स्पर्धेत पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीमने 90.18 मीटर लांब भाला फेकून सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. तर पीटर्सला (Anderson Peters) कांस्य पदकावर समाधान मानावे लागले होते.

पीटर्सला (Anderson Peters) ग्रेनेडात झाली मारहाणज्या बोटीवर या मारहाणीची घटना घडली ती बोट त्रिनिदादच्या व्यापार मंत्र्यांच्या मुलाची आहे. या प्रकरणाची माहिती ग्रेनेडाच्या ऑलिम्पिक समितीने एक दिवस आधी अधिकृत निवेदनाद्वारे दिली होती. पीटर्सला सुदैवाने यामध्ये जास्त दुखापत झाली नाही आहे.

हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई

धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या

Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर

हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल

INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर