अंधेरी पोटनिवडणुक : ऋतुजा लटकेंचा सामना NOTA शी?? पहिल्या फेरीचा निकाल समोर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवणुकीचा पहिल्या फेरीचा निकाल समोर आला आहे. यामध्ये ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना 4277 मते मिळाली आहेत. मात्र लटके यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची मते ही इतर कोणत्या अपक्षाला नव्हे तर NOTA ला मिळाली आहे. त्यामुळे लटके यांच्या विरोधात नोटांचा प्रचार करण्यात आला का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पहिल्या फेरीत ऋतुजा लटके याना 4277 मते पडली. NOTA ला 622 मते, मनोज नायक याना 56 मते पडली. मीना खेडेकवर- 138 मते, फरहान सय्यद- 103 मते, मिलिंद कांबळे- 79 मते, राजेश त्रिपाठी 127 मते, बाला नाडार याना 222 मते मिळाली. याचा अर्थ ऋतुजा लटके यांच्या नंतर सर्वाधिक मतदान नोटाला झालं हे स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे विरोधकांकडून लटके यांच्या विरोधात नोटांचं बटन दाबण्याचा प्रचार सुरु आहे असा आरोप ठाकरे गटाकडून यापूर्वीच करण्यात आला होता.

दरम्यान, अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी ३ नोव्हेंबरला मतदान पार पडलं. भाजप उमेदवार मुरजी पटेल यांनी या पोटनिवडणुकीतून आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यांनंतर लटके यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला आहे. मात्र असे असले तरी ७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यातच या पोटनिवडणुकीत फक्त ३१.७४% मतदान झालं आहे.