राज ठाकरेंनी BJP ला आणखी दोन पत्र लिहावीत, सुषमा अंधारेंनी सांगितला पत्रातील मजकूर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीतून (election) भाजपने माघार घेतल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजय सोप्पा झाला आहे. शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक (election) लागली आहे. मागच्या काही दिवसांत या निवडणुकीवरून राज्यात मोठ्या घडामोडी पाहायला मिळाल्या. भाजपने या निवडणुकीसाठी (election) आपला उमेदवारसुद्धा घोषित केला होता. यादरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून हि पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची मागणी केली. एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडूनही अशीच भावना व्यक्त करण्यात आली.

भाजपने या निवडणुकीत (election) माघार घेतल्यानंतर शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. भाजपचा संवेदनशील राजकारणाशी काडीमात्र संबंध नाही, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं पत्र म्हणजे भाजपची स्क्रीप्ट आहे. ‘राज ठाकरेंच्या पत्राचा परिणाम खरंच भाजपवर होत असेल किंवा भाजप त्यांचं ऐकत असेल, तर राज ठाकरेंनी आणखी दोन पत्र लिहावं. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी वारंवार महाराष्ट्राचा अपमान करत आहेत, असे राज्यपाल तथाकथित महाशक्तीने परत बोलावले पाहिजेत. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात येण्यासाठी पत्र लिहा,’ असा टोला त्यांनी लगावला आहे.

कोल्हापूर आणि पंढरपूर पोटनिवडणुकीतून का माघार घेतली नाही
‘भाजपला पराभव दिसत होता, सगळ्या एजन्सीनी भाजपचा पराभव होईल, असा अंदाज वर्तवला होता. राजकीय नेत्यांच्या आवाहनानंतर माघार घेणे हा एक प्रकारचा मुलामा आहे. जर भाजपला संवेदनशील राजकारण आणि संस्कृती जपायची असती, तर त्यांनी कोल्हापूर आणि पंढरपूर पोटनिवडणुकीतून (election) माघार घेतली असती,’ अशी टीकासुद्धा सुषमा अंधारे यांनी यावेळी केली.

हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय